बॉलिवूडमधला बिनधास्त अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ, ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण केलं आहे. हिंदी, मराठी, गुजराती या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आपल्या अभिनयपेक्षा स्टाईल, बोलण्याचा अनोखा अंदाज यामुळे जॅकी चर्चेत येत असतात. चित्रपटात जरी ते हिंदी संवाद बोलत असतील मात्र इतर वेळी ते टपोरी भाषेत बोलतात. प्रत्येकाला ते भिडू या शब्दाने हाक मारतात. लोकांनादेखील त्यांचा अंदाज आवडतो, खुद्द अमिताभ बच्चन हे त्यांचे चाहते आहेत तसेच जॅकी यांची भाषा त्यांना आवडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे लोक येत असतात. एका भागात जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी आले होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी जॅकी श्रॉफ यांना प्रश्न विचारला की ‘तुम्ही ही भाषा बोलता, भिडू हा शब्द आला कुठून’? यावर जॅकी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या त्याच भाषेत उत्तर दिले, ‘याच शहरातून हा शब्द आला, जिथे मी वाढलो तिथली भाषा बोलतो. तसेच असं बोलण्यमागे तुमचा हातदेखील आहे’. यावर अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले ‘मी कस काय’? त्यावर लगेच जॅकी म्हणाले, ‘तुमचे चित्रपट बघत आम्ही मोठे झालो आहोत आम्ही तुमचे चाहते होतो, तुमचा ‘अमर अकबर अँथनी चित्रपटातले’ संवाद ऐकूनच आम्ही असे बोलायला लागलो’. पुढे अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातील काही संवाद म्हणून दाखवले.

नव्व्दच्या दशकात ‘सलमानचा आवाज’ म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम यांना ओळखले जात होते

१९८२ मध्ये आलेल्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून श्रॉफ यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्याआधी ते मॉडेलिंग करत होते. पुढच्या वर्षी, सुभाष घईने तिला त्यांच्या ‘हीरो’ चित्रपटात मुख्य भूमिकेत कास्ट केले ज्यात जॅकीची नायिका मीनाक्षी शेषाद्री होती. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर जॅकीने अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

https://fb.watch/fLRnJIMjLQ/

जॅकी श्रॉफ यांचा जन्म लातूरचा असला तरी ते मुंबईत लहानाचे मोठे झाले आहेत. मुंबईच्या चाळींमध्ये त्यांचे बालपण गेले आहे. तिकडच्या आठवणी ते कायमच आपल्या मुलाखतीतीतून सांगत असतात. त्यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ आणि आईचे नाव रिटा श्रॉफ आहे. जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हादेखील बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When amitabh bacchan asked actor jacky shroff about his tapori slang spg
First published on: 25-09-2022 at 17:27 IST