अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हेमा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात खूप लहान वयात केली होती. हेमा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दमदार अभिनयाबरोबरच हेमा त्यांच्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. हेमा मालिनी यांनी दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
पण, नंतर हेमा यांनी राज कपूर यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला, ज्यामुळे ते खूप नाराज झाले होते. राज कपूर यांनी हेमा यांना एक चित्रपट ऑफर केला होता, ज्याला अभिनेत्रीने नकार दिला. नंतर तो चित्रपट सुपरहिट ठरला. चला जाणून घेऊया तो चित्रपट कोणता आहे.
हेमा मालिनी यांनी नाकारलेला राज कपूर यांचा चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून, तो १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ आहे. हा चित्रपट राज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड हिट झाला. त्याची कथाच नाही तर त्याची गाणीही प्रचंड हिट झाली.
‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झीनत अमान आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. यासाठी राज यांची पहिली पसंती हेमा मालिनी होत्या. हेमा यांनी नकार दिल्यानंतर राजसाहेबांनी झीनत यांना चित्रपटासाठी निवडले.
जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर राज कपूर स्वतः ‘सत्यम शिवम सुंदरम’साठी हेमा मालिनी यांच्या घरी गेले होते. त्यांनी हेमा यांना चित्रपटाची कथा सांगितली, परंतु ड्रीम गर्लने कोणताही विलंब न करता चित्रपटात काम करण्यास नकार दिला. हेमा यांना चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच बोल्ड वाटली होती, म्हणूनच त्यांनी नकार दिला. राज कपूर यांना हे आवडले नाही.
‘सत्यम शिवम सुंदरम’चे बजेट १.६० कोटी रुपये होते. त्याच वेळी, चित्रपटाने जगभरात ४.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. IMDb वर त्याला १० पैकी ७ रेटिंग मिळाले आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्याबरोबर घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.