scorecardresearch

हेमा मालिनी

‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनींचा (Hema Malini) जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला.

पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.

फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केले होते.
Read More
Loksabha Election 2024 Hema Malini Ravi Kishan Harish Rawat working in fields
हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय? प्रीमियम स्टोरी

निवडणूक जवळ आली की राजकारणी लोकांमध्ये अधिक मिसळायला लागतात. मात्र, त्यांचे हे मिसळणे नैसर्गिक नसले तर त्यावर टीकाही होते.

hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मथुरेच्या खासदार आणि उमेदवार हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप भाजपने काँग्रेस नेत्यांवर केला आहे.

randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

रणदीप सुरजेवाला यांनी जे वक्तव्य केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

MP Hema Malini says Krishna temple will be built in Mathura soon
खासदार हेमा मालीनी म्हणतात, ‘मथुरेत कृष्ण मंदिर लवकरच साकार होणार’

ताडोबा महोत्सवासाठी खासदार हेमामालीनी आज येथे आल्या असता चांदा क्लब ग्राऊंड येथे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री…

Film TV Celebrities BJP candidates
भाजपाकडून बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य आणि बंगाली कलाकारांना लोकसभेची उमेदवारी; वाचा यादी

पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या यादीनुसार भाजपाने ३४ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

A plot to Malini for a dance academy at a very modest rate Mumbai
‘नृत्य अकादमी’साठी हेमा मालिनी यांचा ‘भूखंडशोध’

अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना नृत्य अकादमीसाठी अत्यंत माफक दरात भूखंड देण्याची राज्य शासनाची तयारी असली तरी आता…

Esha Deol will join politics
ईशा देओलचं लग्न मोडलं, आता अभिनय सोडून राजकारणात येणार अभिनेत्री? हेमा मालिनी म्हणाल्या…

घटस्फोटानंतर ईशा देओल राजकारणात येणार? हेमा मालिनी संकेत देत म्हणाल्या, “तिला रस…”

hema malini reaction on esha deol and bharat takhtani divorce
लेक ईशा देओल-भरत तख्तानीच्या घटस्फोटावर हेमा मालिनी काय म्हणाल्या? घ्या जाणून

भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेण्याच्या लेकीच्या निर्णयावर हेमा मालिनींची भूमिका काय?

Esha Deol Bharat Takhtani
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा देओल-भरत तख्तानी यांच्या नात्यात आलेला दुरावा; अभिनेत्री म्हणालेली, “नवऱ्याला असं…”

“त्याच्या गरजा खूप कमी आहे आणि मी…”, ईशा देओलने केलेलं विधान

hema malini visit vyjayanthimala and share photos on being honored with padma vibhushan 2024
वैजयंती माला यांना पद्म विभूषण जाहीर झाल्यावर हेमा मालिनी यांची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्यासाठी हा दिवस…”

हेमा मालिनी यांनी वैजयंती माला यांच्या घरी जाऊन घेतली भेट

संबंधित बातम्या