विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट ‘लाइगर’’ २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची खूप चर्चा झाली आणि कलाकारांनीही जोरदार प्रमोशन केले. पण प्रदर्शित झाल्यानंतर ‘लाइगर’’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. दक्षिणेत त्याने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. याच विजय देवरकोंडाने आपण हिंदी चित्रपट करणार नाही तसेच मुंबईबद्दल देखील वक्तव्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय देवरकोंडाचा ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर त्याने मुंबईला १ दिवसाची धावती भेट दिली होती. मुंबईला आल्यानंतर त्याने करण जोहरची भेट घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार करण जोहरने विजय समोर ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचा प्रस्ताव ठेवला होता मात्र विजयने त्यासाठी नकार दिला होता. अनुपमा चोप्रा यांनी विजय देवरकोंडाची मुलखात देखील होती. ज्यात तो असं म्हणाला होता की, हिंदी चित्रपट करणं इंटरेस्टिंग गोष्ट आहे परंतु मला तेलुगू आणि हिंदी असे काहीतरी करायचे आहे. मला शांत, आळशी जीवनशैली आवडते आणि मला वाटते की, “मुंबई माझ्यासाठी खूप वेगवान आहे. मला माझ्या अटींवर गोष्टी करायला आवडतात..”

”पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि…’ मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी भावुक पोस्ट

अभिनेत्याला कबीर सिंग आणि डिअर कॉम्रेडच्या रिमेकमध्ये काम करण्यास नकार का दिला याबद्दल विचारले गेले असता त्याने उत्तर दिले, “कारण मला हिंदी चित्रपटाचा नायक बनायचे नव्हते, मला अभिनेता व्हायचे होते, कथा सांगायच्या होत्या आणि मी. एकच कथा दोनदा सांगण्यात काही अर्थ नाही. मी एखाद्या चित्रपटावर खूप मेहनत करतो, माझ्या भावना मी पुन्हा प्रकट करू शकत नाही.

विजय देवरकोंडा मूळचा हैद्राबादचा, त्याचे वडील देखील टीव्ही क्षेत्रात कार्यरत होते. २०११ साली ‘नूवीला’ चित्रपटातून त्याने पदार्पण केले. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती २०१७ साली आलेल्या अर्जुन रेड्डी चित्रपटातून, या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेवरून त्याला ट्रोल देखील करण्यात आले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याने आपली विशेष छाप सोडली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When liger actor vijay dervkonda told that he didnt want to do hindi film as hero spg