सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात परदेशात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाकडे देखील बाप्पा विराजमान होतो. गश्मीर महाजनी पासून ते श्रुती मराठे तसेच मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणजे विजू माने यांच्या घरी देखील गणपती असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजू मानेंच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. या संदर्भातील माहिती विजू माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केली.

विजू माने सोशल मीडियावर आपल्या हटके पोस्ट आणि कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. ते असं पोस्ट मध्ये म्हणतात की, ‘खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला ते दरवर्षी येतात पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत त्यामुळे मनात कितीही वाटले तरी ते येतील की नाही शंका होती. पण अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला मुख्यमंत्री तुमच्या घरी येत आहेत त्याआधी सुरक्षेच्या कारणास्तव आमचे लोक तपासणीसाठी तुमच्या घरी येतील. आणि अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या घरी आले’.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
cm eknath shinde criticizes uddhav thackeray
उद्धव ठाकरेंची ‘उठ-बस’सेना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाठिंब्यासाठी राज यांचे अभिनंदन
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात गमावला जीव

विजू माने यांनी पोस्टमध्ये पुढे असं म्हंटल आहे की, दोघांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बरोबरीने खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी न विसरता घरच्या गणपतीचे दर्शन घेतल्याने दिग्दर्शक विजू माने भावुक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच मत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे मांडले आहे.

दिग्दर्शक विजू माने मराठी चित्रपटसृष्टीत कायम चर्चेत असतात. कविता असो किंवा चित्रपट अथवा वेबसिरीज विजू माने प्रेक्षकांना कायमच मनोरंजनाची मेजवानी देत असतात. त्यांच्या ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले आहे. या वेबसिरीजचे नुकतेच तिसरे पर्व सुरु झाले आहे. नेटकऱ्यांचे भरभरून प्रतिसाद या वेबसिरीजला येत आहेत.