मुंबई : व्हिटॅमिन ‘डी’ हाडांची मजबुती, स्नायूंचे कार्य आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याची कमतरता बहुतेक वेळा लक्षात येत नाही. जोपर्यंत व्यक्तीला थकवा, अशक्तपणा किंवा वारंवार आजारपण जाणवत नाही तोपर्यंत सामान्यपणे कोणी व्हिटॅमिन डी ची चचणी करत नाही. मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडने याबाबत देशभरात केलेल्या अभ्यासानुसार ४६ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून आली आहे. त्यातही दक्षिण भारतात ही कमतरता सर्वाधिक असल्याचे त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.
मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड ही भारतातील मोठी पॅथॉलॉजी लॅब चेन असून त्यांनी २०१९ ते जानेवारी २०२५ दरम्यान देशभरातून गोळा केलेल्या २२ लाखांहून अधिक व्हिटॅमिन डी चाचण्यांच्या निकालांवर आधारित एक व्यापक राष्ट्रीय विश्लेषण प्रसिद्ध केले आहे.या अभ्यासातून समोर आले आहे की तपासणी केलेल्या एकूण लोकांपैकी ४६.५ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, तर आणखी २६ टक्के लोकांमध्ये ही पातळी अपुरी आढळली आहे. हे आकडे दर्शवतात की आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या लोकांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. या निष्कर्षांमुळे प्रतिबंधात्मक जागरूकता, योग्य आहार आणि नियमित तपासणी यांची गरज अधोरेखित होते.
दक्षिण भारतात सर्वाधिक कमतरता ५१.६ टक्के नोंदली गेली, ज्यात केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक प्रभावित आहेत. त्यानंतर मध्य भारतात कमतरता ४८.१ टक्का, उत्तर भारतात ४४.९ टक्के, तर पश्चिम भारतात ज्यात महाराष्ट्र समाविष्ट आहे तेथे ४२.९ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून आली आहे. ईशान्य भारतात ३६.९ टक्के जी सर्वात कमी कमतरता दिसली आहे.हे निष्कर्ष सूचित करतात की फक्त भूगोल नव्हे तर शहरी जीवनशैली, सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क आणि चुकीच्या आहाराच्या सवयी हे भारतातील व्हिटॅमिन डी कमतरतेचे मुख्य कारण आहेत.
डेटामधून हेही दिसून आले की हळूहळू सुधारणा होत आहे की, २०१९-२० मध्ये जिथे कमतरता सुमारे ५१ टक्के होती, ती २०२३-२४ मध्ये घटून ४२ टक्के झाली आहे. हे प्रमाण उत्साहवर्धक असला तरी नियमित तपासणी, पोषणपूरक उपाय आणि सार्वजनिक जागरूकता यांचा सातत्याने प्रचार करणे गरजेचे आहे, जेणेकरून दीर्घकालीन आरोग्य समस्यांना आळा बसू शकेल.किशोरवयीन आणि कामकाज करणाऱ्या वयोगटातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता सर्वाधिक दिसून आली आहे, कारण या गटातील लोक जास्तीत जास्त वेळ घरात घालवतात आणि सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवतात.
१३ ते १८ वयोगटातील किशोरांमध्ये सर्वाधिक कमतरता ६६.९ टक्के आढळली असून जी भारतातील तरुणांमध्ये वाढती आणि अनेकदा दुर्लक्षित आरोग्य समस्या अधोरेखित करते. लिंगानुसार पाहता महिलांमध्ये ४६.९ टक्के आणि पुरुषांमध्ये ४५.८ टक्के कमतरता आढळली आहे. म्हणजेच महिलांमध्ये पोषण आणि डायग्नॉस्टिक सेवांपर्यंतचा प्रवेश आता सुधारला आहे. मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्रन चेम्मेनकोटिल म्हणाले, व्हिटॅमिन डी ची कमतरता ही भारतात सर्वाधिक दुर्लक्षित आरोग्य समस्या आहे. तिचे परिणाम हळूहळू दिसतात पण खूप व्यापक असतात. हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकंदर आरोग्य यावर ती थेट परिणाम करते.
व्हिटॅमिन डी हाडांची मजबुती, स्नायूंचे कार्य आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याची कमतरता बहुतेक वेळा लक्षात येत नाही, जोपर्यंत व्यक्तीला थकवा, अशक्तपणा किंवा वारंवार आजारपण जाणवत नाही. व्हिटॅमिन डी ची कमतरता किंवा अपुरेपणाचे नेमके कारण शोधण्यासाठी कॅल्शियम आणि पॅराथायरॉईड हार्मोनची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. मेट्रोपोलिसमध्ये आम्ही वैज्ञानिक अचूकता, ऑटोमेशन आणि रुग्ण शिक्षण यांच्या संयोगाने प्रिव्हेंटिव हेल्थकेअरला बळकट करत आहोत, जेणेकरून योग्य निदान आणि उपचार निर्णय घेता येतील असे डॉ. कीर्ती चड्ढा यांनी सांगितले.
