मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार होऊन १२ दिवस उलटूनही खातेवाटप अद्याप रखडलेलेच आहे. पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
राष्ट्रवादीला द्यावयाच्या खात्यांचा तिढा अद्याप न सुटल्याने खातेवाटप जाहीर होऊ शकलेले नाही. अर्थसह अन्य महत्त्वाची खाती आपल्याला मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गट आग्रही असून त्यांनी त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शिवसेनेच्या वाटय़ाला आलेली खाती देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज, शुक्रवारी चर्चा झाल्यास खातेवाटप मार्गी लागण्याची शक्यता आहे. शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे खातेवाटप कधी होणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
अर्थचा आग्रह.. अर्थसह अन्य महत्त्वाची खाती मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गट आग्रही असून त्यांनी त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली होती.