“आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या”, टिपू सुलतान वादावरून भाजपाचा शिवसेनेवर निशाणा!

टिपू सुलतान यांचं नाव एका मैदानाला देण्यावरून सध्या राज्यात वाद सुरू झाला असून भाजपानं त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

keshav upadhye slams shivsena on tipu sultan name controversy
केशव उपाध्ये यांनी टिपू सुलतान वादावरून शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या टिपू सुलतान नाव प्रकरणाचे रोज नवनवे अंक पाहायला मिळत आहेत. मुंबईतल्या एका मैदानाचं नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नुकताच या मुद्द्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्यानंतर आता भाजपाकडून थेट शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावला आहे.

वाद काय आहे?

मुंबईतील मालवणी भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचं बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. तर, भाजपाने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेला खोचक टोला लगावताना केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

“ही तर संधीसाधू सेना..कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेस (ओ)सोबत रमली, कॉंग्रेस (आय)शी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना!” असं केशव उपाध्येंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

टिपू सुलतान नावावरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”

औरंगाबादचं संभाजी नगर करणं जमत नाही”

“औरंगाबादचं संभाजीनगर करणं जमत नाही. हिंदुत्व फक्त गप्पांपुरतंच राहिलं. १९७० मध्ये मुस्लिम लीगसोबत गेले, आता टिपू सुलतान उद्घोष करत आहेत”, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

याआधीही गोवंडीमधील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६मधील नगरसेविकेने टिपू सुलतान नामकरणाचा प्रस्ताव मांडल्यानंतर भाजपाकडून त्यावर आक्षेप घेण्या आला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp keshav upadhye tweet on tipu sultan controversy aslam shaikh devendra fadnavis pmw

Next Story
टिपू सुलतानवरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी