मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. टिपू सुलतानच्या नावाला भाजपासह बजरंग दलाने विरोध केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या क्रीडा संकुलासमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता. योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर अत्याचार करणारा…”

“टिपू सुलतानचं काय करायचं ते सरकार पाहून घेईल. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही. तुम्ही कशाप्रकारे इतिहास लिहिताय, बदलताय…अगदी दिल्लीत कसा नव्याने इतिहास लिहायला घेतला आहे हे आम्हाला माहिती आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हा सगळा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

टिपूचा राष्ट्रपतींनी केलेला गौरवार्थ उल्लेख भाजपा विसरले का?; नामकरणावरुन सचिन सावंत यांचा सवाल

“आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील तज्ज्ञ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही,” असा सूचकवजा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला.

“मुंबईत काय करायचं त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार समर्थ आहे. काळजी कऱण्याचं कारण नाही. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका,” असंही यावेळी ते म्हणाले.

यापूर्वीही झाला होता वाद..

गोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. “हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्या समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं होतं.

संजय राऊत यांनी राहुल गांधींनी मोदी सरकारचा दबाव असल्याने ट्विटर फॉलोअर्स वाढत नसल्यासंबंधी लिहिलेल्या पत्राबद्दल ते म्हणाले की, “राहुल गांधी यांची पत्रकार परिषद ऐकू, ते समजून घेऊ. नक्कीच सोशल माध्यम हे केंद्र सरकारच्या दबावाखाली आहेत. राहुल जे काय म्हणतात ते पाहू आणि आमचं मत व्यक्त करू”.

Story img Loader