मुंबई : राज्यातील काही महापालिकांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. पण हा निर्णय आजचा नसून, १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता, असे प्रदेश भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सांगितले.
‘त्या वेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी होते. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, राम नवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णयाचे अधिकार महापालिकांना देण्यात आले होते. त्यामुळे या निर्णयाचा आधार घेऊन १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) रोजी कत्तलखाने व मासांहार विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नागपूरसह काही महापालिकांकडून कत्तलखाने व मासांहार विक्री दुकाने बंद निर्णय घेण्यात आला होता,’ असे बन यांनी स्पष्ट केले.