मुंबई: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच वकिलाने केलेला हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय. हा न्यायव्यवस्थेलाच धमकावण्याचा प्रयत्न असून हल्लेखोरांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी करीत काँग्रेसकडून मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदी उपस्थित होते.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला संतापजनक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने पसरवलेल्या विषारी व विषारी विचाराची ही फळे आहेत. वकील हे संविधानाचे रक्षण करणारे सैनिक आहेतहे. संविधान आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समावेशक भारताच्या दृष्टिकोनाचा हा उघड अवमान असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.