‘कॅग’ अहवालातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी!, आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांची मागणी

मुंबई महापालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५  कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.

ashish shelar
आशिष शेलार (संग्रहित फोटो)

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५  कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यात बरेच हात गुंतले असून खरा सूत्रधार उघड होणे आवश्यक असल्याने या सर्व कामांची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेचे नेतृत्व उद्धव व आदित्य ठाकरे करीत होते. त्यांच्या डोळय़ासमोर महापालिकेत टक्केवारीचा धंदा व मुंबईकरांची लूटमार सुरू होती, मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला गेला, हे या अहवालातून उघड झाले आहे, अशी टीका शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.  कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये करोनाची कामे नाहीत.

हेही वाचा >>> आघाडीच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून ‘सावरकर’ मुद्दा बाजूला, सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्युत्तर

काही कामे निविदांविना तर काही निविदांपेक्षा अधिक देण्यात आली आहेत, अटीशर्तीचा भंग आहे. दहिसर येथील राखीव भूखंड अधिग्रहण व्यवहार व अन्य प्रकरणातील भ्रष्टाचार नमूद करून सॅप प्रणालीतील गैरव्यवहार आपण २००७ मध्ये उघड केला होता व आंदोलनही केल्याचे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका

मुंबईत ‘सावरकर गौरवयात्रा’

मुंबईतील ३६ विधान सभांमध्ये  पाच दिवसांत सावरकर गौरवयात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटाचे देखावे, गीते व त्यांचे विचार यांबाबतचे चित्ररथ तयार करून ही यात्रा काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणांमध्ये सावरकरप्रेम दाखवण्यापेक्षा या सावरकर गौरवयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शेलार यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:45 IST
Next Story
वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित
Exit mobile version