Dasara Melava: "...तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश 'मातोश्री'वरुन आले"; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप | dasara melava 2022 rahul shewale says matoshree ask us to abuse raj thackeray when he leave shivsena also ask to attack narayan rane scsg 91 | Loksatta

Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

राज ठाकरे, छगन भुजबळ आणि नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा नेमकं काय सांगण्यात आलं होतं यासंदर्भात दावा खासदाराने केला

Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडताना काय झालं याबद्दलही भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामधून लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी वडील चोरले या आरोपाला उत्तर दिलं आहे. या भाषणामध्ये शेवाळेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस ‘मातोश्री’वरुन आलेल्या आदेशांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

आदित्य ठाकरेंनी केलेल्या खोके घेतल्याच्या आरोपांवरुन उत्तर देताना शेवाळे यांनी, “याच युवराजांना आम्ही सांगू इच्छितो की, छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्ही सर्वजण शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिलो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की किती खोके आम्हाला त्यावेळी दिले,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शेवाळे यांनी राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला मातोश्रीवरुन राज यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आणि त्यांना शिव्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याचा उल्लेख केला.

नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”

“२००५ मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्ही आम्ही शिवसेनेला साथ दिली. शिवसेनाप्रमुखांना साध दिली. तेव्हा किती खोकी दिली याचाही आम्हाला हिशोब मिळायला पाहिजे. तेव्हा तर आम्हाला असे आदेश होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा. कार्यालयावर मोर्चे काढा, त्यांना शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, असे आरोप आम्हाला ‘मातोश्री’वरून वारंवार येत होते,” असं शेवाळे म्हणाले.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

तसेच शेवाळे यांनी नारायण राणेंच्या घरावर हल्ला करण्यासाठी ‘मातोश्री’वरुन आदेश आल्याचाही दावा केला. “नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्हाला असेच आदेश यायचे की, चेंबुरचे कार्यालय फोडा. माझी पत्नी इथं उपस्थित आहे. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी रुग्णालयात होतो. त्याचा फक्त चेहरा बघितला आणि लगेच साहेबांचा ‘मातोश्री’वरुन आदेश आला की, कणकवलीला जा आणि नारायण राणेंविरोधात सभा घ्या. लगेच आम्ही बॅग भरून त्या सभेला गेलेलो. आयुष्यातील एवढे महत्त्वाचे क्षण आम्ही संघटनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी दिले. त्या क्षणांची किंमत कधीच खोक्यात होऊ शकत नाही,” असं भावनिक विधान शेवाळेंनी केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava 2022: “…तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप चोरला” राहुल शेवाळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

संबंधित बातम्या

VIDEO: “ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य
प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”
बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक, शंभुराज देसाई संतापले; म्हणाले “सहनशीलतेला काही…”
“महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘सकारात्मक’ चर्चा झाली म्हणजे फसवेगिरी…”, युतीबाबत प्रकाश आंबेडकरांची रोखठोख भूमिका
Maharashtra News Live: बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘गदर’ चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मानेही केलं होतं काम, शुटिंग करताना खाव्या लागलेल्या शिव्या
KGF चे निर्माते शाहरुख खानला घेऊन करणार चित्रपट; रिषभ शेट्टी दिसणार ‘या’ भूमिकेत
पुणे : हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई; झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध
डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक, सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या; म्हणाल्या, “राज्यकर्ते एवढे…”