मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सेतूवरून अपेक्षित वाहतूक होत नसून, टोलमध्ये वाढ केल्यास वाहनांची संख्या आणखी रोडावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात आलेला हा २२ किमी लांबीचा प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे शक्य झाले आहे. त्याच्या वापराकरिता ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के सवलतीच्या दराने, कमीत कमी २५० रुपये पथकर आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. पण भरमसाठ पथकर आणि वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफी यामुळे अटल सेतूकडे वाहनांचा कल कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of toll concession on atal setu mumbai news amy