गोरेगाव, आरे दुग्ध वसाहतीत लहान मुलीवर हल्ला करणाऱ्या त्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. सोमवारी ज्या ठिकाणी बिबट्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला होता त्या ठिकाणाहून अवघ्या २०० मीटर अंतरावरून बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा :आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुरडीने गमावला जीव, दिवे लावून घरात जाताना हल्ला

युनिट क्रमांक १५ येथील ईतिका अखिलेश लोट या दीड वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून मंगळवारी वनविभागाने युनिट क्रमांक १५ ते आदर्श नगर परिसरात २२ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दोन पिंजरे लावले. बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला अशी माहिती विनविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दुर्घटना घडलेल्या ठिकाणाहुन अगदी २०० मीटर अंतरावरून बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या बिबट्याला आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department caught leopard in aarey colony mumbai print news tmb 01