Ganeshotsav 2022 : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. घराघरात गणपती बाप्पांचं भक्तीभावाने आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

“यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत”

एकनाथ शिंदे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “आज श्री गणेश चतुर्थी. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ”

हेही वाचा : विश्लेषण : पुण्यात मिरवणुकीत मानाच्या गणपतींचे महत्त्व काय? या प्रथेविषयी आक्षेप काय आहेत?

“मंदावलेली विकासाची गती पुन्हा वाढवायची आहे. कितीही संकटं येऊ द्या, त्याची चिंता करायची नाही. तशी हिंमत बाळगुया,” असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2022 at varsha by cm eknath shinde and family in mumbai pbs