health department get order to keep seven days isolation to measles patients zws 70 | Loksatta

गोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट

राज्यभरात सुमारे १२ हजार गोवर संशयित आढळून आले आहेत

गोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, मालेगावसह राज्यातील २६ ठिकाणी गोवरचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत ७२४ बाधित आढळले आहेत. राज्यभरात सुमारे १२ हजार गोवर संशयित आढळून आले आहेत. गोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण करून त्यांच्यावर तिथेच उपचार करून नंतर स्थलांतरित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली.

राज्यात आतापर्यंत गोवरमुळे १५ बालकांचा मृ्त्यू झाला आहे.  मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, पिंपरी-चिंचवड मालेगाव, औरंगाबाद, बुलढाणामध्ये गोवरची साथ पसरली आहे. या सर्व ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या ८७७ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्यावी, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. गोवर प्रतिबंधात्मक औषधे, ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 05:11 IST
Next Story
सायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप