मुंबई : विधानसभा आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर १३ ऑक्टोबरला देणार आहेत. वेळकाढूपणा न करता एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने अध्यक्षांकडे केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. सुनावणीबाबतचे वेळापत्रक दोन-चार दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही सादर केले जाणार आहे.
नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना सोमवारी दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी पाचारण केले होते. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. त्याबाबत माहिती देताना खासदार अनिल देसाई आणि आमदार अॅड. अनिल परब
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hearing on mla disqualification petitions adjourned judgment on october 13 ysh