Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखल भाग जन्म झाले. अशाच माटुंगा पोलिसांच्या हद्दीत साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेले शाळेच्या बसमधील सहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी बस मधून बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले ही बस डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन प्रतीक्षा नगर येथे जात होती.
मुसळधार पावसामुळे माटुंगा, वडाळा, दादर टीटी, भोईवाडा, जुहू गल्ली, वाकोला, अंधेरी, किंग्ज सर्कल येथे पाणी साचले होते. अशातच किंग सर्कल येथे शाळेची बस बंद पडली होती. दीड फूट ते दोन फूट पाणी साचल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता माटुंगा पोलिसांनी या मुलांना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. माटुंगा पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
मुंबई रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गावर पावसामुळे परिणाम झाला पूर्व मुक्त मार्गावरील दक्षिण वाहिनीवरीलही वाहतूक संत गतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सीमा मार्ग येथील वाहतूक संत गतीने सुरू होती. अंधेरी मार्केट, जे जे पूल येथीलही वाहतुकीची गती मंदावली होती असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. वरळी नाका, उत्तर वाहिनी, वांद्रे, बँड स्टँड, जे जे मार्ग, हिंदमाता, माटुंगा, किंग्स मार्केट येथे दीड फूट पाणी साचले होते हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू होती.