मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : वर्सोवा-विरार सागरी सेतू होऊ देणार नाही, मच्छिमार संघटनांचा एमएमआरडीएला इशारा
सांताक्रूझ येथे वास्तव्यास असलेली १५ वर्षांची पीडित मुलगी एकटीच असल्याचे पाहून तिच्या नातेवाईकाने १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान तिचा विनयभंग केला. पीडित मुलीची आई नुकतीच तिला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला सोमवारी रात्री राहत्या घरातून अटक केली.
First published on: 28-11-2023 at 15:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai accused who molested a minor girl arrested by the vakola police mumbai print news css