मुंबई : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहूल शेवाळे उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘वंदे भारत ट्रेन’चे जनक सुधांशू मणी यावेळी महानगरपालिकेच्या अभियंत्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील वेतनविसंगती अहवालात केवळ अभियंत्यांच्या संदर्भातील शिफारशींनाच पालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे केवळ त्यांच्याच शिफारशी मंजूर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती राष्‍ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात शुक्रवार, १५ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते रात्री दहा या वेळेत होत असलेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्‍हणून ‘वंदे भारत ट्रेन’चे जनक सुधांशू मणी उपस्थित राहणार आहेत. तर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल हे विशेष अतिथी असतील. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे हे सन्माननीय अतिथी म्‍हणून उपस्थित रहाणार आहेत.

हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी: पहिल्या दिवशी काय घडलं? शिंदे गटाचे वकील म्हणाले…

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी महानगरपालिका अभियंते कलाविष्‍कार सादर करणार आहेत. त्‍यानंतर महानगरपालिकेतील अभियांत्रिकीशी संबंधित प्रत्येक विभागाची माहिती, कामगिरी चित्रफितीद्वारे सादर करण्यात येईल. त्यानंतर सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) चंद्रशेखर चोरे प्रशासकीय अभियांत्रिकी या विषयावर संबोधित करणार आहेत. महानगरपालिकेतील अभियंत्यांनी लिहिलेले लेख, काव्य, प्रवासवर्णन आदी साहित्याचे संकलित रुप असलेल्या ‘मी अभियंता’ या पुस्‍तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai cm eknath shinde attend national engineers day at mumbai municipal corporation mumbai print news css