मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ११ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमावलीनुसार या बदल्या करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम मलिक्कार्जुन प्रसन्ना यांनी बदल्याचे आदेश शुक्रवारी जारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहरात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्य पोलीस दलाला केली होती. त्यानंतर मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक अशा एकूण १११ अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यात प्रवीण दत्ताराम राणे, रवींद्र परमेश्‍वर अडाणे, बळवंत व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, संजय सदाशिव मराठे, सुनील दत्ताराम जाधव, रुता शंशाक नेमलेकर, हर्षवर्धन यशवंतराव गुंड, हेमंत सहदेव गुरव, मनिषा अजीत शिर्के, इरफान इब्राहिम शेख, संध्याराणी शिवाजीराव भोसले, मथुरा नितीनकुमार पाटील, उषा अशोक बाबर, गणेश बाळासाहेब पवार, जगदीश पांडुरंग देशमुख, जयवंत श्याम शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय राजीव शिवाजीराव चव्हाण, राजेश रामचंद्र शिंदे, संतोष जगन्नाथ माने, अनधा अशोक सातवसे, संजय थानसिंग चव्हाण, तानाजी सहदेव खाडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद तावडे यांची मिरा – भाईंदर – वसई – विरार आणि विक्रम साहेबराव बनसोडे, राजेंद्र श्रीमनधर काणे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा…गोष्ट मुंबईची! भाग १५५ : मुंबईला नाव मिळाले मुंबादेवीवरून, पण मग देवीला नाव कशावरून मिळाले?

याशिवाय बिलाल अहमद अमीरुद्दीन शेख, सचिन शिवाजी शिर्के, जयश्री धनश्याम बागुल – भोपळे, भास्कर दत्तात्रय कदम, विनायक विलास पाटील, विशाल विलास पाटील यांची पिंपरी – चिंचवड, जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर यांची नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच मंगेश लक्ष्मण हांडे, अमर नामदेव काळंगे, अब्दुल रौफ गनी शेख, राणी लक्ष्मण पुरी, अश्‍विनी बबन ननावरे, राहुल विरसिंग गौड, राजेंद्र भाऊराव पन्हाळे, शशिकांत दादू जगदाळे यांची पुण्यात बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकूण १११ पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री उशीरा जारी करण्यात आले.

हे ही वाचा…निवडणुका जवळ येताच सत्ताधारी आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा; भाजपा आमदाराच्या मागणीनंतर वीर सावरकर ट्रस्टला मिळाली जमीन

मुंबईत ११ नवीन अधिकारी

याशिवाय मुंबई पोलीस दलाला ११ नवे अधिकारीही मिळाले आहेत. त्यात त्यात शहाजी नारायण पवार (सोलापूर), संजय पंडित पाटील, कैलास दादाभाऊ डोंगरे, जनार्दन सुभाष परबकर (रायगड), वैभव कांतीनाथ शिंगारे, गिरीश गणपत बने, मालोजी बापूसाहेब शिंदे (ठाणे), अनिल भाऊराव पाटील (नंदूरबार), संजय पांडुरंग पाटील (सांगली – पोलीस प्रशिक्षण केंद्र) आणि गजानन दत्तात्रय पवार (गुन्हे अन्वेषण विभाग) या अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In preparation for upcoming assembly elections 111 police inspectors have transferred including 11 to mumbai mumbai print news sud 02