मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत स्थानकात प्री-नाॅन-इंटरलाॅकिंग कामासाठी विशेष ब्लाॅक घेतला आहे.या ब्लाॅक कालावधीत रेल्वेवरील उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना कर्जत ते खोपोली लोकल प्रवास करता येणार नाही. कर्जत स्थानकावर २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत पायाभूत कामे केली जाणार आहेत. या कालावधीत टप्प्याटप्यात ब्लाॅक घेतला जाईल.
नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ दरम्यान, कर्जत फलाट क्रमांक ३ ते चौक स्थानकादरम्यान २७ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. ब्लॉक कालावधी कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही.
२७ ते २९ सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम
डाऊन उपनगरीय रेल्वे रद्द
कर्जतहून दुपारी १२, दुपारी १.१५ आणि दुपारी १.३९ या वेळेत सुटणाऱ्या कर्जत-खोपोली उपनगरीय रेल्वे रद्द करण्यात येतील.
अप उपनगरीय रेल्वे रद्द
खोपोलीहून सकाळी ११.२०, दुपारी १२.४० आणि दुपारी १.५५ या वेळेत सुटणाऱ्या खोपोली-कर्जत उपनगरीय रेल्वे रद्द करण्यात येतील.
उपनगरीय रेल्वे अंशतः रद्द
सीएसएमटीहून दुपारी १२.२० या वेळेत सुटणारी सीएसएमटी-खोपोली उपनगरीय रेल्वे कर्जत येथे अंशतः रद्द केली जाईल.
खोपोलीहून दुपारी १.४८ या वेळेत सुटणारी खोपोली-सीएसएमटी उपनगरीय रेल्वे कर्जतवरून तिच्या नियोजित वेळेत सुटेल.
२८ सप्टेंबर रोजी मेल/एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गे वळवली जाईल आणि पनवेलच्या प्रवाशांसाठी रेल्वेगाडी कल्याण येथे थांबेल.
३० सप्टेंबर रोजी धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
डाऊन उपनगरीय रेल्वे रद्द
कर्जतहून दुपारी १२ आणि दुपारी १.१५ या वेळेत सुटणारी कर्जत-खोपोली उपनगरीय रेल्वे रद्द केली जाईल.
अप उपनगरीय रेल्वे रद्द
खोपोलीहून सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० या वेळेत सुटणारी खोपोली-कर्जत उपनगरीय रेल्वे रद्द केली जाईल.
३० सप्टेंबर रोजी (मंगळवार) मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले
२९ सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक ११०१४ कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस कोइम्बतूरहून तिच्या नियोजित वेळेनुसार सकाळी ८.५० ऐवजी दुपारी १२.५० या वेळेस सुटेल.
२९ सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२१६४ चेन्नई-एलटीटी एक्स्प्रेस चेन्नईहून तिच्या नियोजित वेळेनुसार सायंकाळी ६.२५ ऐवजी रात्री ९.२५ या वेळेत सुटेल.
३० सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२२६३ पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस पुण्याहून तिच्या नियोजित वेळेनुसार सकाळी ११.१० ऐवजी दुपारी ३.१० या वेळेत सुटेल.