राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपाकडून या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन उद्योगात पार्टनरशिप असल्यामुळेच त्यांना विशेष वाईनप्रेम असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत कुटुंबीयांची वाइन कंपनीत भागीदारी!; किरीट सोमय्यांचा आरोप; राऊतांचे प्रत्युत्तर

तर, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर देत “किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का?” असा उलट सवाल केला होता. हे प्रकरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून पुन्हा सोमय्यांनी राऊतांना लक्ष्य केलंय.

“अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का?” वाईन व्यवसाय भागीदारीच्या आरोपावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

टीव्ही ९ मराठीशी बोलताना सोमय्या यांनी संजय राऊतांना पुन्हा काही प्रश्न विचारले आहेत. ‘तुमच्या कुटुंबात कधी कोणी उद्योग केला नाही, व्यवसाय केला नाही. चोपड्यात तर तुम्ही एक दमडीही दिली नाही. मग अशोक गर्ग यांनी तुम्हाला व्यवसायात पार्टनरशीप दिलीच कशी?, तुम्ही दोन नंबरने लपून छपून पैसे दिले की उद्धव ठाकरेंसोबत काही सेटलमेंट घडवून आणलं, परदे के पिछे क्या है?,’ असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

“अशोक गर्ग यांची वाईन उद्योगात १०० कोटींची उलाढाल आहे, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा त्यांनाच होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बदल्यात राऊतांना ही पार्टनरशीप मिळाली का?, याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं,” असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं. “कोण ढोकळा विकतोय, कोण शेंगदाणे विकतोय, हा टाईमपास बंद करा. तुमचा एक रुपयाचाही उद्योग व्यवसाय नाही, मग तुम्हाला ही पार्टनरशीप कशी मिळाली,” असा प्रश्न सोमय्या यांनी राऊतांना विचारलंय.

किरीट सोमय्यांचे आरोप काय..

संजय राऊत यांच्या कुटुंबीयीची वाईन उद्योगात पार्टनरशिप असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. “संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कारनामे फक्त पैसे गोळा करणे हे आहेत. तुम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले आहात का? संजय राऊतांनी सांगावं, किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुपचे अशोक गर्ग यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप केली. त्यांच्या परिवारात त्यांच्या कन्या, त्यांची पत्नी किती व्यवसायांमध्ये अधिकृत पार्टनर आहेत?”, असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

“अशोक गर्ग हे २००६ पासून मॅगपी ग्रुप चालवतात. २०१०मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, पब येथे वाईन वितरीत करणं हा आहे. अशोक गर्ग यांची महाराष्ट्रात मोनोपोली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अधिकांश वाईन याच ग्रुपची जाते. १०० कोटींची वार्षिक उलाढाल या ग्रुपची आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायात कुणाचीही पार्टनरशिप नव्हती. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी मॅगपी कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या”, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. यावेळी किरीट सोमय्या यांनी संबंधित कागदपत्र देखील माध्यमांसमोर दाखवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somayya questions sanjay raut over his family partnership in vine industry hrc