पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळामधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र असं असतानाच नव्याने संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये पक्ष बदल करुन आलेल्या खासदारांचा भरणा अधिक असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षांमधून आलेल्यांना संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. असं असतानाच यावर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> Coronavirus: “..ते विरोधकांना पहावलं नसेल”; पदभार स्वीकारताच डॉ. भारती पवारांनी साधला निशाणा

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडेंना निष्ठावंतांना डावलल्यासारखं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पंकजा यांनी भाजपामध्ये निर्णय घेण्याची एक पद्धत असते असं सांगितलं. पक्षातील सर्वोच्च नेते किंवा निर्णय घेणारं नेतृत्वच काय निर्णय घ्यायचा हे ठरवतात. प्रीतम मुंडेंबरोबरच हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र मुंडेंच्या नावाभोवती वयल जास्त असल्याने त्याबद्दल फार चर्चा झाली. पण आता ही थांबवायला हवी, असं मत व्यक्त केलं. तसेच नवीन लोकांमध्ये नेतृत्वाला काही गुण दिसले असती त्याचा पक्षाला फायदा होणार असेल असंही पंकजा यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> New Cabinet : मोदींनी पहिल्याच बैठकीत उपस्थित केला करोनाचा मुद्दा; मास्क न घालता फिरणाऱ्यांबद्दल म्हणाले…

पक्षाच्या बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जातेय का?, असा प्रश्न विचारण्यात आला असला पंकजा यांनी, “पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचे मोठे नेते महत्वाचे निर्णय घेत असतात. विधानपरिषदेमध्ये नवीन नेतृत्वांना संधी दिली होती. युती झाली तेव्हा आमच्यासोबत राजू शेट्टी, महादेव जानकरांसारखी नेतृत्वं जोडले गेले होते. त्याचप्रमाणे आता नवीन लोक जोडले गेले आहेत. नवीन सहकारी आल्यानंतर पक्षाची ताकद वाढणार असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत, असं पंकजा म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना त्यांनी पक्षातील या व्हेरिएशनमुळे तसेच नवी मंत्र्यांमुळे पक्षाचं एकजरी मत वाढत असेल तर त्याचंही स्वागत करते असंही पंकजा यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> Modi New Cabinet : अमित शाहांकडे दिलेल्या ‘त्या’ नव्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जाणीवपूर्वक डावललं जात आहे का? यासंदर्भात तुमचं वैयक्तिक मत काय आहे?, असे प्रश्न विचारण्यात आला असता पंकजा यांनी, “वैयक्तिक मत जाहीरपणे करायचं नसतं,” असं सुचक वक्तव्य करत प्रीतम मुंढे यांच्या कार्याचा पाढा वाचून दाखवला.

महाराष्ट्रातून संधी देण्यात आलेले तिघे भाजपावासी नेते…

महाराष्ट्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटीलभागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे. मात्र यापैकी भागवत कराड वगळता इतर तिन्ही खासदार हे पूर्ण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये होते. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेले नारायण राणे हे पूर्वी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होते. तसेच आरोग्य मंत्रालयातील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या डॉ. भारती पवार या सुद्धा २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्याचप्रमाणे पंचायत राज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेले कपिल पाटीलही २०१४ पर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते. त्यामुळेच अर्थराज्यमंत्री भागवत कराड वगळता राज्यातून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले सर्व नवीन मंत्री हे अन्य पक्षातून भाजपावासी झालेले नेते आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi new cabinet pankaja mude talks about oath given to many leaders came from other party scsg