मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे, वरळी अशा टप्पा २अ च्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आज, शुक्रवारी (९ मे) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अचे लोकार्पण केले जाणार आहे. लोकार्पणानंतर शनिवारी सकाळी टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून मुंबईकरांना आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने लोकार्पणाचा सोहळा पार पडणार असून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री लोकार्पण करणार आहेत. लोकार्पणावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रो प्रवासही करणार आहेत. दरम्यान लोकार्पणानंतर, शनिवारी (१०मे) टप्पा २ अ प्रवाशांसाठी खुला होईल.

शनिवारपासून या मार्गिकेवरील प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा थेट भुयारी प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

साधेपणाने लोकार्पणाचा सोहळा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने लोकार्पणाचा सोहळा पार पडणार असून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री लोकार्पण करणार आहेत. लोकार्पणावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रो प्रवासही करणार आहेत. दरम्यान लोकार्पणानंतर, शनिवारी (१०मे) टप्पा २ अ प्रवाशांसाठी खुला होईल. शनिवारपासून या मार्गिकेवरील प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा थेट भुयारी प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

अखेर प्रतीक्षा संपली…

● फेब्रुवारी-मार्चपर्यंत १०० टक्के बांधकाम पूर्ण केले. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मार्चमध्ये या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर पडले आणि मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली. पण दीड महिन्यांपूर्वी अखेर सीएमआरएसचे पथक मुंबईत दाखल झाले आणि चाचण्यांना सुरुवात झाली. या चाचण्या पूर्ण करत सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करत एप्रिलअखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल अशी शक्यता होती. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने पुन्हा लोकार्पणाची प्रतीक्षा लांबली.

● त्यानंतर महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी टप्पा २ अ चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा घाट राज्य सरकारने घातला. त्यानुसार तयारीही सुरु केली. पंतप्रधानांची वेळही मागितली. ही वेळ मिळण्याची शक्यता होती. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने १ मेचा मुहुर्त चुकला. १ मे चा मुहुर्त चुकल्यानंतर आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते.