मुंबईः आगामी अधिवेशन तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले. या कारवाईत मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्या कारवाईत २०७ ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी शहरात नाकाबंदीदरम्यान ६९०१ वाहनांची तपासणी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व ५ प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व १३ परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, अमलीपदार्थ, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व शोधमोहिम राबवण्यात आली. फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वॊरंट आणि स्थायी वॊरंट बजावणे,अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

ऑलआउट अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

  • मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील तसेच फरार १२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
  • ४६ जणांवर अजामीनपात्र वॉरंटसंदर्भात कारवाई करण्यात आली.
  • अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-यांवर १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण १६ जणांवर कारवाई करून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
  • अवैध दारू विक्री /जुगार इ.अवैध धंदयांवर १४ ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले आहेत.
  • मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, पंरतु मुंबई शहरातऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेले एकुण ५४ तडीपार आरोपींवर मपोका. कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे
  • महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम १२० व १२२ अन्वये संशयितरित्या वावरणारे एकुण ५६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
  • मुंबई शहरात एकुण २०७ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले , त्यामध्ये अभिलेखावरील अनेक आरोपी तपासण्यात आले .
  • सर्व पोलीस ठाण्यांचे हददीत एकुण ११३ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
  • त्यामध्ये एकुण ६९०१ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
  • मोटारवाहन कायदयान्वये १८९१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
  • कलम १८५ मो.वा.का. अन्वये ७० मध्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police operation all out 5836 vehicles inspected search operation at 207 places in the city mumbai print news css