Mumbai Breaking News Updates, 31 July 2025 : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले आहे. तसेच, ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार असल्याचे आमिष दाखवून रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने याबाबत सावध राहण्याचे आवाहन कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा यासह इतर मागणीसाठी २ ऑगस्टपासून नागपुरातून विविध जिल्ह्यांत मंडल जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे.
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi: पुणे, मुंबई, मुंबई-महानगर, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
अजगराने गिळला जंगली ससा, अन् मग…
‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’ संस्थेच्या सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक अजगराला रेस्क्यू केले आणि त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. …अधिक वाचा
जेएनपीटी ते दिल्ली नवीन मिसिंग लिंक प्रकल्पाची आखणी; विरार-अलिबाग महामार्ग रखडल्याने पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न
हा महामार्ग मोरबे, महाळुंगी, कानपोली, पाले बुद्रुक, वळवली, टेंभोडे मार्गे कळंबोली सर्कल येथील आठपदरी महामार्गाला जोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. …सविस्तर वाचा
काँग्रेसी पर्याय ! शेखर शेंडेंना उदय मेघे, तर अमर काळे यांना अनंत मोहोड
शेखर शेंडे किंवा त्यांच्या समर्थकांचा मुळीच विचार न झाल्याची प्रतिक्रिया आहे. जिल्ह्यात आता नवे नेतृत्व देण्याचा विचार झाल्याचे चित्र दिसून येते. …अधिक वाचा
पुण्यातील कंत्राटी सेवकांना सेवेत ‘ कायम’ करण्यात येणार ? महापालिकेचा मोठा खुलासा !
ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार असल्याचे आमिष दाखवून रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने याबाबत सावध राहण्याचे आवाहन कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले आहे. …सविस्तर वाचा
वसई-विरारच्या माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह सहा जणांना ईडीचे समन्स…
छाप्यांमध्ये १.३३ कोटींची रोकड व मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे जप्त …सविस्तर वाचा
जातनिहाय जनगणना… ओबीसी युवा अधिकार मंचकडून मंडल जनगणना यात्रा… हा आहे मार्ग…
केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा यासह इतर मागणीसाठी २ ऑगस्टपासून नागपुरातून विविध जिल्ह्यांत मंडळ जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे
…सविस्तर वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ३१ जुलै २०२५