Mumbai News Updates, 21 July 2025 मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले.

तसेच मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात रविवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur News Updates in Marathi

10:35 (IST) 22 Jul 2025

कोट्यवधीच्या अर्धवट जळालेल्या नोटा सापडलेल्या न्यायमूर्तींबाबत सरन्यायाधीशांचे मोठे विधान; म्हणाले, ‘ते अजूनही…’

मार्च २०२५ मध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी आग लागल्याची घटना घडली. आग विझवताना एका खोलीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जळालेल्या अवस्थेत आढळून आली. …अधिक वाचा
10:35 (IST) 22 Jul 2025

कोट्यवधीच्या अर्धवट जळालेल्या नोटा सापडलेल्या न्यायमूर्तींबाबत सरन्यायाधीशांचे मोठे विधान; म्हणाले, ‘ते अजूनही…’

मार्च २०२५ मध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी आग लागल्याची घटना घडली. आग विझवताना एका खोलीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जळालेल्या अवस्थेत आढळून आली. …अधिक वाचा
19:05 (IST) 21 Jul 2025

मग लोकल साखळी बॉम्बस्फोटात दोषी कोण? – उज्ज्वल निकम

साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात अनेक निरपराध माणसे ठार झाली असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, असेही ते म्हणाले. …वाचा सविस्तर
18:09 (IST) 21 Jul 2025

डोंबिवली टाटा नाका येथे एमआयडीसीच्या चेंबरमध्ये पडून वृध्दाचा मृत्यू

कल्याण शीळ रस्त्यावरील टाटा पाॅवर जवळील गांधीनगर भागात बाबू धर्मू चव्हाण (६०) या वृध्दाचा एमआयडीसीच्या पाणी सोडण्याच्या चेंंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांनी केला आहे. …सविस्तर वाचा
18:02 (IST) 21 Jul 2025

पर्यटकांना मुंबई महापालिकेच्या इमारतीची भुरळ; चार वर्षात २० हजार पर्यटकांची भेट

महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू नागरिकांना तसेच पर्यटकांना पाहता यावी, यासाठी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी, रविवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालय पुरातन वारसा दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. …वाचा सविस्तर
17:58 (IST) 21 Jul 2025

ठाणे, भिवंडी, मिराभाईंंदरमध्ये मंगळवारऐवजी शुक्रवारी पाणी नाही; मिराभाईंदरमधील पाणी टंचाई टाळण्यासाठी निर्णय

स्टेम प्राधिकरणाने मंगळवारचा पाणी बंदचा निर्णय रद्द करत शुक्रवार, २५ जुलैा रोजी सकाळी ९ ते शनिवार, २६ जुलै रोजी ९ वाजेपर्यंत पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. …सविस्तर बातमी
17:39 (IST) 21 Jul 2025

२००६ मुंबई बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटल्यानंतर एटीएसने घेतला हा निर्णय

मुंबईत २००६ उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी दहशवाद विरोधी पथकाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(मोक्का) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणी मोक्का विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. …सविस्तर वाचा
17:33 (IST) 21 Jul 2025

पत्नीने फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या; वडगाव शेरीतील घटना

मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी आणि अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
17:14 (IST) 21 Jul 2025

ठाणे जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीया सदोष; मंजुरपदापेक्षा जास्त शिक्षकांची नेमणुक

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र, हि प्रक्रीया सदोष असल्यामुळे त्याचा फटका अनेक दुर्धर आजारी, दिव्यांग तसेच इतर शिक्षकांना बसल्याचे समोर आले आहे. …वाचा सविस्तर
17:07 (IST) 21 Jul 2025

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रीन गटारी’; पर्यावरणवादी संघटनेने जंगलातून काढला शेकडो किलो कचरा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जैवविविधता आहे. या जंगलात दुर्मिळ वृक्ष, प्राणी-पक्षी आढळून येतात. परंतु बेकायदेशीररित्या जंगलात प्रवेश करुन मद्यपींकडून जंगलामध्ये पार्ट्या केल्या जातात. …सविस्तर बातमी
17:01 (IST) 21 Jul 2025

मुलाच्या आठवणीसाठी घराला ‘७/११ हर्षल स्मृती’ नाव; न्याय मिळाला नसल्याची वडिलांची खंत

दहशतवाद्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होईल, अशी त्यांना आशा वाटत होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल ऐकून हर्षलचे वडील यशवंत भालेराव निराश झाले आहेत. …अधिक वाचा
16:49 (IST) 21 Jul 2025

Video : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला नवा व्हिडिओ…

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले. या अधिवेशनात राज्याचे कृषीमंत्री सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. …सविस्तर बातमी
16:43 (IST) 21 Jul 2025

धोकादायक इमारतीची पडझड, एकाचा मृत्यू; उल्हासनगरच्या फर्निचर बाजारातील घटना, कामगार सुरक्षेकडे दुर्लक्ष

मृत कामगाराचे नाव रावसाहेब नंदनवरे असे असून, ते या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपासून कार्यरत होते. …सविस्तर वाचा
16:35 (IST) 21 Jul 2025

भाजपची पोलखोल होत असल्याने राहुल गांधींवर आरोप; रॉबर्ट वाड्रा प्रकरणात राज्यातील काँग्रेस नेत्याची टीका

मोदी सरकारने स्वायत्त संस्थांचा राजकीय वापर करूनही २०२४ मध्ये देशातील जनतेने काँग्रेसच्या शंभर टक्के जागा वाढवून, मजबूत विरोधी पक्षनेते पद बहाल केले, तर भाजपच्या संसदेतील ३५ टक्के जागा कमी केल्या आहेत, असा दावा तिवारी यांनी केला. …सविस्तर वाचा
16:04 (IST) 21 Jul 2025

कल्याणमधील जिल्हा परिषद शिक्षिकेचे मोबाईल सीमकार्ड बंद करून दोन लाखाची फसवणूक

अनिता खाडे असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या कल्याण पूर्वेतील देवळेकरवाडी भागात कुटुंबीयांसह राहतात. …सविस्तर वाचा
15:47 (IST) 21 Jul 2025

ठाणे रेल्वे स्थानकात प्रतिक्षालयाच्या जागेत कॅफेटेरिया

कॅफेटेरिया सुरु झाल्याने आता अर्ध्या जागेत प्रतिक्षालय आणि अर्ध्या जागेत कॅफेटेरिया असेल. या कॅफेटेरियात खाद्य पदार्थ, चहा, शीत पेय उपलब्ध होईल. …अधिक वाचा
15:38 (IST) 21 Jul 2025

ठाणे स्थानक पश्चिमेतील सॅटीस पुलाच्या जिन्याची दुरावस्था

या जिन्यावरील पायऱ्या तसेच लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत. यामुळे गर्दीच्या वेळेत घाईत असलेले प्रवासी या जिन्याच्या तुटलेल्या पायऱ्यांवर वारंवार पाय अडकून पडत आहेत. …सविस्तर बातमी
15:28 (IST) 21 Jul 2025

लक्षवेधीनंतरही गळक्या छताखालीच उपचार! ढिम्म प्रशासन रुग्ण त्रस्त; शहापूर उपजिल्हा रुग्णालय…

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमवेतच चक्क शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला देखील पावसामुळे गळती लागल्याचे उघड झाले होते. …अधिक वाचा
15:27 (IST) 21 Jul 2025

पुण्यात वडिलांनी मुलाचा केला खून; आरोपी वडीलांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत प्रशांत याला दारूचे व्यसन होते.यावरून सातत्याने घरामध्ये वाद होत होते.नेहमी प्रमाणे प्रशांत हा दारू पिऊन आला आणि आई वडिलांना शिवीगाळ करू लागला. …अधिक वाचा
15:05 (IST) 21 Jul 2025

डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी दवाखान्यासाठी गाळा भाड्याने देणाऱ्या कडोंमपातील फार्मासिस्टवर कारवाईची मागणी

हा गाळा भाड्याने घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांचीही याप्रकरणात चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी उपजिल्हाप्रमुख भगत यांनी केली आहे. …सविस्तर बातमी
14:04 (IST) 21 Jul 2025

कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्यामुळे अजित पवार पुन्हा अडचणीत

विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफित आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर बचाव करताना खुद्द कोकाटे आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) कोंडी झाली आहे. …अधिक वाचा
13:47 (IST) 21 Jul 2025

अण्णा डांगे स्वगृही परतणार

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजप शिवसेना युतीचे सरकार अपक्षांच्या मदतीने सत्तेवर आले. या मंत्री मंडळात अण्णा डांगे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. …वाचा सविस्तर
13:47 (IST) 21 Jul 2025

डोंबिवलीतील सेवाभावी डाॅक्टर श्रीराम कुलकर्णी यांचे निधन

रुग्ण सेवेबरोबर ज्ञानदान, सामाजिक कार्यात अखंडपणे कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ डाॅक्टर श्रीराम कुलकर्णी यांचे सोमवारी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. …वाचा सविस्तर
13:33 (IST) 21 Jul 2025

Video : जामिनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला…

या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
13:20 (IST) 21 Jul 2025

घोडबंदरमधील गायमुख घाटात वाहतुक कोंडी

घोडबंदर येथील गायमुख घाटात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारे अवजड वाहन बंद पडले. यामुळे गायमुख घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. …वाचा सविस्तर
13:13 (IST) 21 Jul 2025

२००६ रेल्वे बॉम्बस्फोट : मुंबईची जीवनवाहिनी थांबली

११ जुलै,२००६ चा मंगळवार मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माटुंगा ते मिरा रोड दरम्यान सात बॉम्बस्फोट घडले. प्रथम श्रेणीच्या डब्यात घडवून आलेल्या या स्फोटांमध्ये १८६ जणांना मृत्यू झाला. …अधिक वाचा
13:06 (IST) 21 Jul 2025

सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका

जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत. नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश,हा सत्ताधारी वर्ग देत आहे. त्यांना इतकच सांगणे आहे की, सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! असे आव्हाड म्हणाले आहेत. …सविस्तर बातमी
12:40 (IST) 21 Jul 2025

पुणे: शहरातील मद्य विक्री दुकाने चोरट्यांचे ‘लक्ष्य’, मद्य विक्री दुकाने फोडून रोकड चोरीचे प्रकार वाढीस

चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून मद्याच्या बाटल्या, रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. …वाचा सविस्तर
12:27 (IST) 21 Jul 2025

पुण्यात बनावट मद्याची तस्करी, पाच ठिकाणी छापे; पाच जण अटकेत

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
12:22 (IST) 21 Jul 2025

मातामृत्यू विश्लेषणाप्रमाणे क्षयरोग मृत्यू विश्लेषण गरजेचे!

भारतात क्षयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त असून जगातील एकूण क्षयरुग्णांच्या तुलनेत भारतात २७-२७ टक्के क्षयरुग्ण आहेत. याला व्यापक प्रमाणात अटकाव करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २१जुलै २०२५