Mumbai News Updates, 30 July 2025 : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी छापे टाकले. मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ही ठिकाणे असून नाशिकमधील छाप्यात एक कोटी २० लाख रुपये आढळून आले आहेत. तसेच,‘खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई एकतर्फी आणि विशिष्ट हेतू ठेवून केली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Live Updates
Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi : मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा सविस्तर…
औषधनिर्माणशास्त्राच्या १५० संस्थांकडून निकष पायदळी; उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस
करोना काळात राज्यातील फार्मसी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नव्या संस्थांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे अर्ज पाठवले होते. …सविस्तर बातमी
अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ लाख विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम; पहिली यादी ३१ रोजी जाहीर होणार
या कालावधीत १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी सायंकाळी ८ पर्यंत पसंतीक्रम अर्ज भरले आहेत. यंदा प्रवेश नियमावलीत बदल असून पहिल्या तीन पर्याय असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. …अधिक वाचा
अकरावीच्या चौथ्या फेरीतील प्रवेश ३१ जुलैपासून; चौथ्या फेरीसाठी ३ लाख ८६ हजार विद्यार्थी पात्र
चौथ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी २९ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार चौथ्या फेरीसाठी ७ हजार ५१ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. …सविस्तर बातमी
आधी नितीन गडकरींना शिविगाळ, नंतर माफीनामा…
गडकरींच्या मतदारसंघातच एका व्यापाऱ्याची बोलता बोलता जीभ घसरली आणि त्यांनी चक्क गडकरींच्या बाबतीत जातीवाचक अर्वाच्च शब्दांत उल्लेख करीत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. …वाचा सविस्तर
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने दिले नागपुरातील नेत्यांना बळ; उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि बरेच काही
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर कार्यकारिणी निवडीचा पेच होता. अखेर त्यांनी नागपूर शहराचे महत्व लक्षात घेता त्यांनी कार्यकारिणीतील जुन्या नेत्यांना कायम ठेवत काही नवीन चेहऱ्यांना नेत्यांना स्थान दिले आहे. …सविस्तर वाचा
बीडीडी प्रकल्पातील आर्थिक चणचण होणार दूर; विक्री घटकातील दोन व्यावसायिक भूखंडांच्या ई लिलावातून म्हाडाला ८०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता
या ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान ८०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्पातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. …अधिक वाचा
वांद्रे, सांताक्रूझ परिसरात गुरुवारी पाणी नाही; आजच पाणी भरून ठेवा
वांद्रे पश्चिमेकडील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेटवरील एकूण चार झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. …सविस्तर बातमी
राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. …सविस्तर वाचा
खुशखबर! एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदांसाठी १०९ जागांची ऐतिहासिक भरती; अनुभवाची अट रद्द…
पूर्वीच्या भरती प्रक्रियेत ‘अनुभव’ ही अट बंधनकारक होती, जी फार्मसी पदवी घेताच सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होती. …सविस्तर वाचा
खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फी – जाणीवपूर्वक बदनामी; एकनाथ खडसे यांचा आरोप
‘एका घरात पाच ते सहा जण बसले असतील, तर त्याला रेव्ह पार्टी म्हणायचे का?’… …वाचा सविस्तर
खंडणीसाठी टोळक्याचा हॉटेलमध्ये धुडगूस, चौघे अटकेत
थोरात यांनी नकार दिल्याने संतप्त टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. थोरात यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली. …अधिक वाचा
‘एमपीएससी’कडून पदभरतीची सर्वात मोठी जाहिरात; १ ऑगस्टपासून अर्ज सुरू, ९ नोव्हेंबरला परीक्षा…
या परीक्षेसाठी १ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. २१ ऑगस्टपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. …सविस्तर वाचा
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी… ‘गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षे’ची जाहिरात प्रसिद्ध…
९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार… …अधिक वाचा
वसई-विरारच्या माजी आयुक्तांवर ईडीचे छापे; मुंबई, नाशिकसह १२ ठिकाणी कारवाई, कागदपत्रे, रोख रक्कम जप्त
वसई-विरार महापालिकेत संघटीतरित्या भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. …सविस्तर वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ३० जुलै २०२५