Mumbai Breaking News Today , 8 July 2025 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या तुलनेत इतर भागात पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या इतर भागांतील ताज्या घडामोडी या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi

13:26 (IST) 8 Jul 2025

कार्यालयीन वेळेत बदल… मुंबईचे डबेवाले नाराज…

कार्यालयीन वेळेत बदल झाल्यास मुंबईच्या डबेवाल्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुपारचा जेवणाचा डबे पोहोचविण्याचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. …अधिक वाचा
13:25 (IST) 8 Jul 2025

न्यायालयाच्या तोंडी आदेशानंतरही बांधकामावर कारवाई करणे भोवले…

ताडदेव येथील पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानासाठी पात्र ठरणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करावे या मागणीसाठी सागर नार्वेकर यांनी याचिका केली होती. तसेच, त्यांनी २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेले सुधारित इरादा पत्र रद्द करण्याची मागणी देखील केली होती. …सविस्तर बातमी
13:19 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदर शहरात तणाव, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त; आंदोलनावर ड्रोनची नजर

मिरा भाईंदर शहरात निघणाऱ्या मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे जरी असले तरीही मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाम राहत शहरात मोर्चा काढला. …अधिक वाचा
13:10 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदरमधील तणावामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद

मराठी भाषिक मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, सकाळी दहा वाजल्यानंतर मिरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले. …अधिक वाचा
13:04 (IST) 8 Jul 2025

वकील बार कौन्सिलचे कर्मचारी नाहीत, त्यांना पॉश कायदा लागू नाही; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मालक आणि कर्मचारी संबंध जेथे येतो तेथे पॉश कायदा लागू होतो. तथापि, बार कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल यांना वकिलांचे मालक म्हणता येणार नाही. …वाचा सविस्तर
12:59 (IST) 8 Jul 2025

परभणी जिल्ह्यात भीज पाऊस, खरिपाला संजीवनी

सोमवारी (दि.७) सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. …वाचा सविस्तर
12:49 (IST) 8 Jul 2025

शेतकऱ्यांनी शेतात पेरले चक्क भाजपचे झेंडे!….गांजा, अफूचे पीक घेण्यासाठी आता सरकारला…

शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. आता पेरणी बंद. आता सरकारने आमची जमीन घ्यावी, नाहीतर गांजा, अफूचे पीक घेऊ द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ज्या शेतामध्ये भाजपचे झेंडे रोवण्यात आले तेथे पदयात्रेदरम्यान थांबून बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. …सविस्तर वाचा
12:45 (IST) 8 Jul 2025

पर्युषण पर्वात प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालण्यावरून उच्च न्यायालयाची टिप्पणी…

याचिकांद्वारे दोन्ही ट्रस्टनी येत्या २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पर्युषण पर्वात नऊ दिवसांसाठी प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालण्याची मागणी केली. …सविस्तर बातमी
12:44 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू

पोलीस आंदोलकांची अडवणूक करीत असल्याने आता छोट्या गटागटाने एकत्र येत आंदोलन सुरू आहेत. …सविस्तर वाचा
12:30 (IST) 8 Jul 2025

पिंपरी : महापालिकेच्या विकास आराखड्यातील देवस्थानच्या जमिनींवरील आरक्षणे रद्द करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. …अधिक वाचा
12:28 (IST) 8 Jul 2025

अबू सालेमच्या कारावासाची २५ वर्षे अद्याप पूर्ण नाहीत…सुटकेबाबत दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार…

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सालेम याच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करताना त्याला दिलासा नाकारला. …सविस्तर बातमी
12:18 (IST) 8 Jul 2025

सहार पोलीस ठाण्यात आरोपीची आत्महत्या

अंकित एका हॉटेलात वेटर म्हणून काम करीत होता. आपल्या सहकाऱ्यांसह तो सहार गावातील एका खोलीत रहात होता. त्या खोलीतील सहकाऱ्यांचे ५ मोबाइल ३० जून रोजी चोरीला गेले होते. …वाचा सविस्तर
12:15 (IST) 8 Jul 2025

उरण: मच्छीमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळले

नव्याने उभारण्यात आलेल्या या करंजा बंदरात मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी शिरकाव केला आहे. …सविस्तर बातमी
12:04 (IST) 8 Jul 2025

काटई निळजे रेल्वे उड्डाणपुलावर शिंदे सेनेची सारवासारव सुरूच…

शिळफाटा रस्त्यावरील सात वर्षापासून सुरू असलेल्या काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे घाईघाईने उद्घाटन करून सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या कामाचा विचका केला, अशी जोरदार टीका समाज माध्यमांत सुरू आहे. …सविस्तर बातमी
12:00 (IST) 8 Jul 2025

जेएनपीटी महामार्गावरील अपघाताला कारणीभूत दोषांचे निवारण कधी? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अनास्था

पळस्पे ते जेएनपीटी हा महामार्ग दुचाकीस्वार आणि हलक्या वाहनांसाठी धोकादायक महामार्ग बनला आहे. यंदाच्या वर्षी १ जानेवारी ते जून महिन्यापर्यंत या महामार्गावर पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. …सविस्तर बातमी
11:46 (IST) 8 Jul 2025

अश्लील चित्रफितीच्या आधारे ३ कोटींची खंडणी…३२ वर्षीय सनदी लेखापालाने केली आत्महत्या

सनदी लेखापाल राज मोरे (३२) सांताक्रूझ येथे आईसोबत रहात होता. तो शीव येथील एका कंपनीत कामाला होता. …वाचा सविस्तर
11:45 (IST) 8 Jul 2025

मानखुर्दमध्ये टेम्पोची रिक्षाला धडक, महिला प्रवासी जखमी

कामोठे येथे वास्तव्यास असलेली वृषाली चलवादी (३०) सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रॉम्बे परिसरात राहणाऱ्या आईला भेटायला रिक्षाने जात होती. …वाचा सविस्तर
11:41 (IST) 8 Jul 2025

भाईंदर : रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या तबेले धारकांवर पालिकेकडून गुन्हा दाखल

अनेक वेळा ही जनावरे रस्त्याच्या मध्येच बसत असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. …अधिक वाचा
11:40 (IST) 8 Jul 2025

“कोरा, कोरा… करदो… सातबारा!”, ‘तोहफा’ चित्रपटातील गाण्याचे विडंबन; बच्चू कडूंचा सरकारला सणसणीत टोला

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘७/१२ कोरा कोरा यात्रे’ला काल पापळ (अमरावती) येथून सुरवात झाली. …अधिक वाचा
11:34 (IST) 8 Jul 2025

गुप्तधनासाठी अघोरी कृत्य : अल्पवयीन मुलीस चटके, आईलाही बंदिस्त ठेवले

वंजारी फैल परिसरातील घरावर छापा टाकताच, पूजा करत असलेल्या व्यक्तीने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. …सविस्तर वाचा
11:28 (IST) 8 Jul 2025

शुल्क न भरल्याने मुलीची आत्महत्या ? पण आमदार म्हणतात…

वडील शेतमजुरी करतात तसेच अधिकचे दोन पैसे मिळावे म्हणून इतरांची शेती पण मक्त्याने करतात. …सविस्तर बातमी
11:22 (IST) 8 Jul 2025

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपल्यानंतर शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्यासाठी १० ते १३ जुलैदरम्यान अवधी देण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
11:13 (IST) 8 Jul 2025

नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अपघातानंतर वाहनचालक पसार

विमल विजू आहेर (वय ५४, रा. पाटील वस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
11:02 (IST) 8 Jul 2025

काटई निळजे पुलावरील बॉटलनेकमुळे शिळफाट्यावरील वाहतूक कोंडी कायम; सहा पदरी शिळफाटा रस्ता काटई, निळजे भागात चौपदरी

नव्याने खुला करण्यात आलेल्या काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजुला काटई, निळजे गावांची हद्द आहे. या भागातील बाधित शेतकऱ्यांनी अद्याप शिळफाटा रस्ता रूंदीकरणासाठी जमीन दिली नाही. …वाचा सविस्तर
10:42 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदरचा ५० टक्के परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली, तर उर्वरित कामासाठी निधीची कमतरता

आता अन्य ठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठी निधीची मोठी तूट प्रशासनाला भासत आहे. त्यामुळे हे काम शासनाच्या निधीतून पूर्ण व्हावे यासाठी पालिकेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
10:36 (IST) 8 Jul 2025

अनेक फ्लॉप सिनेमे देऊनही २८० कोटींच्या संपत्तीचा मालक, ‘या’ अभिनेत्याला SBI महिन्याला देते लाखो रुपये, कारण….

Biggest Flop Actor of Bollywood : आई-वडील सुपरस्टार, पण मुलाला मिळालं नाही अपेक्षित यश …वाचा सविस्तर
10:35 (IST) 8 Jul 2025

मराठी मोर्चा निघण्यापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. …सविस्तर बातमी
10:28 (IST) 8 Jul 2025

भंडारा: अतिवृष्टीसदृश पाऊस, तरीही शाळांना सुट्टी नाहीच; विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसाने जोर धरला असून मुसळधार सुरू आहे. …वाचा सविस्तर
10:18 (IST) 8 Jul 2025

शासकीय अनास्था व समन्वयाच्या अभावामुळे बाडा पोखरण व २९ गावांची प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग योजना रखडली

डहाणू तालुक्यातील या १७.३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला ऑगस्ट २०२२ मध्ये तांत्रिक मान्यता व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

10:17 (IST) 8 Jul 2025

पालघर : नवली फाटकातून पादचाऱ्यांचा धोकादायक प्रवास सुरूच; फाटक बंद मात्र पादचारी सुसाट, प्रशासन सुस्त

पालघर पूर्व पश्चिमेला जोडणारी नवली रेल्वे फाटक १० एप्रिल २०२५ रोजी कोणत्याही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज  ८ जुलै २०२५