Mumbai Breaking News Today , 8 July 2025 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या तुलनेत इतर भागात पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या इतर भागांतील ताज्या घडामोडी या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नालासोपारा इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्याची मागणी
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत.
वसई : शहरात उघड्या गटारांमुळे अपघाताचा धोका, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
मात्र काही ठिकाणी झाकणांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे : पहिल्या सव्वा दोन महिन्यांतच महापालिकेला १४०० कोटींचे उत्पन्न, हे आहे कारण !
महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मिळकत कर विभागाकडे पाहिले जाते.
वस्ती संसाधन केंद्रामार्फत महापालिकेच्या योजनांचा लाभ, पिंपरी महापालिकेचा उपक्रम
महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले, इशारा पातळी ओलांडली; कारधा लहान पुलावर…
जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावासाची रिपरिप सुरू आहे.
वरळीतील डोममध्ये रंगणार ‘प्रो – गोविंदा’च्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम थरार, क्रिकेटर ख्रिस गेल ब्रॅण्ड ॲम्बेसेडर असणार
ठाणे येथे प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी रंगणार आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीविरोधात तक्रार करणाऱ्याचा जबाब नोंदवला, ईडीकडून तपासाला सुरूवात
चव्हाण यांनी सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह इतरांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
भाजपमधून निष्कासित माजी मंत्री शिवसेना शिंदे गटात! जगदीश गुप्तांच्या पक्षबदलाने भाजपला धक्का
जगदीश गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात अमरावती मतदारसंघातून बंडखोरी केली होती.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ८ जुलै २०२५