मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लाॅक मालिका सुरू असून आता ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेरळ-कर्जत आणि खोपोली-कर्जत लोकल सेवा उपलब्ध नसेल. ब्लाॅक कालावधीत प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत.
कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या, लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
ब्लॉकची तारीख आणि कालावधी
३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ६ पर्यंत
४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.४५ पर्यंत
१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० पर्यंत
वाहतूक ब्लॉक विभाग
भिवपुरी स्थानक – जांब्रुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन ते कर्जत
ब्लॉक कालावधीत लोकल सेवा बंद
३ ऑक्टोबर रोजी नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नाही.
४ ऑक्टोबर आणि १० ऑक्टोबर रोजी कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नाही.
३ ऑक्टोबर रोजी लोकल वेळापत्रकावर होणारा परिणाम
– दुपारी २.५५ वाजता सुटणारी खोपोली – कर्जत लोकल रद्द करण्यात येईल.
– सकाळी ९.०१, ९.३०, ९.५७ आणि सकाळी ११.१४ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येईल. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द असेल.
– दुपारी १२.०५ वाजता ठाणे – कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येईल. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द असेल.
– दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल नेरळ येथे रद्द करण्यात येईल. नेरळ – खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसेल.
– सकाळी १०.३६ वाजता आणि दुपारी २.४५ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द असेल.
– सकाळी १०.४३, ११.१९, दुपारी १२, १ आणि दुपारी १.५५ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.
– दुपारी १.२७ वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल.
– दुपारी १२.२३ आणि दुपारी ४ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.