मुंबईः मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवरही पोलीस लक्ष ठेऊन आहेत. मराठा आंदोनलाच्या पार्श्वभूमिवर समाज माध्यांवरील २९ आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”

मराठा आंदोलनाला पार्श्वभीमूवर राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्यामुळे राज्यभरातील सर्व पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलनाच्या आडून काही समाजकंटक अहिंसक घटनांना खतपाणी घालत घालण्याची शक्यता असल्यामुळे त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खासगी व सरकारी संपत्तींचे नुकसान आंदोलन चिघळवणाऱ्या व्यक्तींवरही कारवाईच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती दिली.

हेही वाचा >>> “…तर महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजीनामे द्यावेत”; उद्धव ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे म्हणाले…

समाज माध्यमांवरूनही आक्षेपार्ह पोस्ट व प्रक्षोभक पोस्टद्वारे हिंसक घटनांना खतपाणी घालण्याची शक्यता लक्षात घेता समाज माध्यमांवरही पोलिसांना लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २९ प्रक्षोभक पोस्ट महाराष्ट्र सायबर विभागाने शोधून काढल्या असून त्या तात्काळ हटवण्यात आल्या आहेत. या पोस्टबाबत संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल,असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सायबर विभागही समाज माध्यमांवर नियमीत लक्ष ठेऊन असतात. दोन वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यात ट्वीटर, इन्स्टाग्राम,फेसबुक, यूट्युबवरील चित्रफीती यांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offensive posts on social media removed due to maratha reservation issue mumbai print news zws