Promo war between Shiv Sena and Shinde factions ahead of dasara Melava | Loksatta

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या दोन गटात ‘प्रोमो युद्ध’

शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन अक्षरशः युद्ध सुरू आहे. यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या दोन गटात ‘प्रोमो युद्ध’
(सांकेतिक छायाचित्र)

दसरा मेळाव्याला दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेच्या दोन गटात जुन्या भाषणांच्या चित्रफितीवरून जोरदार ‘प्रोमो वॉर’ सुरू आहे. विसर न व्हावा या शीर्षकांतर्गत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांचीच जुनी भाषणे ऐकवून शिवसेनेला काँग्रेसवर केलेल्या टीकेची आठवण करून दिली आहे. तर सेनेने निष्ठावंतांना साद घातली आहे.

हेही वाचा- Shinde vs Thackeray: शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर, रंगणार नवा ‘सामना’, पण चिन्हाचं काय?

शिवसेनेच्या दोन गटात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा या विषयावरून अक्षरशः युद्ध सुरू आहे. आधी परवानगीवरून राजकारण, शह काटशह, मग न्यायालयीन लढाई हे सगळे झाल्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या जाहिरातीतून एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत.

शिवसेनेने सगळ्यात आधी मेळाव्याचे टिजर तयार करून त्यातून निष्ठावंतांना साद घातली होती. शिवाजी पार्क वरील मेळावा हा निष्ठावंतांचा मेळावा आणि बिकेसी वरील मेळावा हा गद्दारांचा मेळावा असे म्हणत शिंदे गटाला डिवचले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांचे शेवटच्या काळातील भाषणही या प्रोमोमध्ये वापरण्यात आले होते. उद्भवला सांभाळा, असे सांगणारी ही ध्वनीचित्रफीत शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात प्रसारित केली. मात्र त्यानंतर शिंदे गटाकडून अशाच जुन्या भाषणाच्या चित्रफितीमधील मोजकीच वाक्ये घेऊन प्रोमोचा मारा सुरू झाला आहे.

हेही वाचा- Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो

विसर न व्हावा या शीर्षकांतर्गत ही जुनी भाषणे मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. काही भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर, अजित पवारांवर टीका केलेली आहे. तर शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर कसे आपल्या खास शैलीतून फटकारले होते त्याची आठवण करून देणाऱ्या चित्रफिती शिंदे गटाने आपल्या प्रोमोमध्ये वापरल्या आहेत. विचारांचा वारसा अशा शीर्षकाने शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
वीसपेक्षा अधिक गुन्ह्यात सहभागी आरोपीला अटक

संबंधित बातम्या

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
आदेश बांदेकर यांना कडू दुधीरसाची बाधा
चर्चा सकारात्मक!; प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा दावा
गोवंडीत पालिका कर्मचाऱ्यांवर स्थानिकांची दगडफेक
बाजारगप्पा : जुन्या कपडय़ांचा बाजार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी हटणार’; छत्रपती  संभाजीराजे यांचे विधान
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: फडणवीसांची अमित शाहांशी फोनवरून चर्चा , नेमकं काय बोलणं झालं?
रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण
“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी
पिंपरीः चिंचवड गोळीबार प्रकरणात तीन आरोपी अटकेत