Mumbai Pune Nagpur Breaking News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीने कारवाई करण्यावर राज्य सरकारने लगाम कसला आहे. कोणतेही पाडकाम करण्यासाठी किमान १५ दिवस आधी ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. तर आज देशात जात, उपजात आणि धर्माच्या नावाने भांडणे होत आहेत. महापुरुषांची जयंती साजरी करताना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे सह राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील विविध घडामोडींच्या बातम्या या live blog च्या माध्यमातून वाचता येतील.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 1st may 2025 : मुंबई, पुणे, नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स

10:21 (IST) 1 May 2025

गड-किल्ले पाहण्याची पावसाळ्यात संधी ; भारतीय रेल्वेची ‘भारत गौरव सर्किट यात्रा’

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालवण्याकरीता पुढाकार घेतला आहे. …अधिक वाचा
09:32 (IST) 1 May 2025

मुळा नदीच्या सुशोभीकरणात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन? वन्यजीवरक्षकाचा दावा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी केला आहे. …वाचा सविस्तर
09:31 (IST) 1 May 2025

पोलिसांना पाहताच सोनसाखळी चोर गडबडले; हिसकावलेली चैन पाच मिनिटात महिलेच्या हातात

दुचाकीवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावल्यानंतर पोलीस दिसताच गडबडीत पळताना सोनसाखळी काही अंतरावर पडली.अवघ्या पाच मिनिटात हिसकावलेली सोनसाखळी महिलेला परत मिळाली. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे