गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तसेच अन्य प्रमुख रस्त्यांची पाहणी करुन, आवश्यक तिथे तातडीने दुरुस्ती-डागडुजीची कामे पूर्ण करावीत,  अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणपती उत्सवासाठी मुंबईतून मोठय़ा संख्येने लोक आपापल्या गावी कोकणात जातात. करोनाचा प्रादुर्भाव अजून थांबलेला नाही, त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खासगी वाहने, एसटी या शिवाय सध्या दुसरा पर्याय नाही. अशा वेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी अशोक चव्हाण यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीत ठाणे जिल्ह्य़ाचे  पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्हानिहाय स्थितीबाबतची माहिती अशोक चव्हाण यांना दिली व रस्ते दुरूस्तीाबाबत काही सूचना मांडल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repair the roads in konkan before ganeshotsav ashok chavan abn