Rs 218 crore fine will be collected from ticketless passengers in the state | Loksatta

राज्यात विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपये दंड वसूल

मध्य रेल्वेच्या मुंबईसह पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली

राज्यात विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपये दंड वसूल
राज्यात विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपये दंड वसूल (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेच्या मुंबईसह एकूण पाच विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारून २१८ कोटी रुपये दंड वसूस करण्यात आला. या कालावधीत मुंबई विभागात १३ लाख ४८ हजार विनातिकीट प्रवाशांकडून ७७ कोटी ४ लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट

मध्य रेल्वेच्या मुंबईसह पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधूून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३२ लाख ७७ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २१८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एप्रिल-नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १२४ कोटी ६९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मुंबईतील तिकीट तपासनीस आर. एम. गोरे यांनी तब्बल ११ हजार ०२४ विनातिकीट प्रवाशांना पकडले असून एक कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 22:56 IST
Next Story
राज्यातील किमान तापमानात वाढ होणार