राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

आरटीपीसीआर करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नितीन गडकरींचं ट्विट

 

भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.  लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो”, असे ट्विट गडकरींनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss sarsanghchalak dr mohan bhagwat tests corona positive adn