Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला झाल्याची घटना घडली होती. मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील सैफ अली खानच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर सैफ अली खानला रक्तबंबाळ अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढला होता. दरम्यान, काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या हल्लेखोराचं नाव आहे. पोलीस आता आरोपीची चौकशी करत असून सैफ अली खानवर हल्ला करण्याचा हेतू काय? ही घटना नेमकं कशी घडली? या घटनेमागे कोणाचा हात आहे का? अशा वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तसेच आरोपीच्या विरुद्ध पोलीस आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करत आहेत. तसेच सैफ अली खानवर हल्ला करताना आरोपीने वापरलेल्या चाकूचा एक तुकडा पोलिसांना मिळून आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला घेऊन मुंबईतील वांद्रे तलावाजवळ जवळपास दीड ते दोन तास शोध मोहिम राबवली.आरोपीने चाकूचा एक भाग तलावाजवळ फेकल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम होती घेतली आणि पोलिसांना एक महत्वाचा पुरावा हाती लागला. चाकूचा एक तुकडा या ठिकाणी पोलिसांना मिळाला असून मुंबई पोलिसांनी तो जप्त केला. हा चाकूचा तुकडा पुराव्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीने चाकूचा एक तुकडा फेकून दिला होता. त्यामुळे आरोपी मोहम्मद शहजादने चाकूचा तुकडा नेमके कुठे फेकला? याचा तपास पोलीस करत होते. यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीने तलावात फेकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चाकूचा तुकडा जप्त केला आहे.