मुंबई : जन्मदाता पिता आणि प्रियकराने १६ वर्षीय मुलीवर अनेक दिवस बलात्कार केल्याची घटना चेंबूर येथे घडली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावर पीडित मुलगी कुटुंबियांसह राहत असून याच परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणासोबत तिचे प्रेमसबंध आहेत. या आरोपीने मुलीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच मुलीच्या वडिलांनी घरात कोणी नसताना मुलीवर अनेकदा बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रियकर आणि वडिलांना गुरुवारी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual abuse of minor girl by father and boyfriend mumbai print news amy