"शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 'हिंगोलीचा डीजे' वाजणार", संतोष बांगरांचं सूचक विधान | shinde group mla santosh bangar on dasara melava and hingolicha DJ rmm 97 | Loksatta

Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान

Dasara Melava 2022 Updates: आज मुंबईत दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार, अशा आशयाचं विधान बांगर यांनी केलं आहे.

Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान
आमदार संतोष बांगर (संग्रहित फोटो)

Dasara Melava 2022 Latest News : आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे व बीकेसी मैदानातून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सूचक विधान केलं आहे. आज मुंबईत दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार, अशा आशयाचं विधान बांगर यांनी केलं आहे. आपण अनेकदा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ‘हिंगोलीचा डीजे’ ऐकला आहे. त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही, असंही बांगर यावेळी म्हणाले. त्यामुळे यंदा संतोष बांगरही दसरा मेळव्यात बोलणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “….तर मी दुर्गेचं रुप धारण करेन”, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

यावेळी संतोष बांगर म्हणाले, “मागील बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की ‘हिंगोलीचा डीजे’ मुंबईवरती वाजला पाहिजे. आज महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला सांगणार आहेत. हे विचार ऐकण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक बीकेसी मैदानावर पोहोचले आहेत. बीकेसी मैदानात सध्या डीजेचा टॉप बेस लावण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होणार आहेत.”

हेही वाचा- Dasara Melava 2022 : “तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही”, पंकजा मुंडेंचं विधान

‘हिंगोलीचा डीजे’ नेमका कोणत्या प्रकारचा आहे? असं विचारलं असता बांगर म्हणाले, “हिंगोलीच्या डीजेबाबत तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं, तुम्ही वारंवार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ‘हिंगोलीचा डीजे’ कसा वाजतो, हे ऐकलं असेल. आज त्यापेक्षाही आगळावेगळा हिंदुत्वाचा आवाज, गर्व से कहो हम हिंदू है, अशा पद्धतीने हा डीजे वाजणार आहे. गेल्या अडीच वर्षात हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, आज तो आवाज खुलणार आहे, असंही बांगर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava: गर्दी जमण्यास सुरुवात! उद्धव साडेसातला ‘मातोश्री’वरुन निघाणार तर CM शिंदे…; जाणून घ्या कधी सुरु होणार भाषणं

संबंधित बातम्या

“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…त्याचा मी पुरावा आणला आहे”, म्हणत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्रच वाचून दाखवलं!
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा