Shinde MLA Sanjay Shirsat criticizes Shiv Sena MP Sanjay Raut msr 87 | “संजय राऊत हा असा व्यक्ती आहे, की राहुल गांधींचा आणि शरद पवारांचा फोटो शिवसेना भवनात...” संजय शिरसाटांचं टीकास्त्र! | Loksatta

“संजय राऊत हा असा व्यक्ती आहे, की राहुल गांधींचा आणि शरद पवारांचा फोटो शिवसेना भवनात…” संजय शिरसाटांचं टीकास्त्र!

जाणून घ्या, संजय राऊतांवर एकेरी भाषेत टीका करत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले आहेत?

sanjay raut and sanjay shirsat
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच, यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच टोला लगावला आहे.

मुंबईमध्ये काल हिंदू जनआक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे शिवसेना भवनाच्या परिसरातच या मोर्चा काढण्यात आला होता. तर या मोर्चावरून शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा व शिंदे गटावर कालही टीका केली होती आणि आज सामनाच्या अग्रलेखामधूनही टीका करण्यात आली आहे. याशिवाय आजच्या सामनाच्या मुख्यपृष्ठावर वरील भागात मोठ्या छायाचित्रासह राहुल गांधींची बातमी आणि त्याच पृष्ठावर खाली हिंदू जनआक्रोश मोर्चाची बातमी लावण्यात आल्याने, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर एकेरी भाषेत टीकस्त्र सोडले आहे.

हेही वाचा –“आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि…” संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर!

संजय शिरसाट म्हणाले, “मी वारंवार सांगत आलोय की संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आजच्या घडीला संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे. तो नेमकं काय करतोय हे त्याला सुद्धा कळत नाही. संजय राऊत हा असा व्यक्ती आहे की राहुल गांधींचा फोटो आणि शरद पवारांचा फोटो हा शिवसेना भवनात लावायला कमी करणार नाही.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.

याचबरोबर, “सर्वधर्म समभावाची व्याख्या त्याला पाठ झालेली आहे. ज्याचा विरोध शिवसेना प्रमुखांनी केला होता, जे गाडलेले मुडदे आहेत त्यांना जिवंत करण्याचं काम संजय राऊत करतो आहे. म्हणून संजय राऊतला आणखी हिंदुत्व कळायला फार अवकाश आहे. शिवसेना संपली असं समजूनच तो अशी विधानं करत आहे. आता कदाचित शेवट काय करायचा आहे, या विवंचनेत तो सुद्धा आहे.” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

…त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे –

याशिवाय, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “या निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल, की महाविकास आघाडी जरी झाली तरी शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपाने जी रणनीती आखलेली आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अनेक ठिकाणचा पराभव त्यांनी(महाविकास आघाडीने) मान्य केलेला आहे, या पराभवास आता कसं पचवावं या विवंचनेत ते लोक आहेत.” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:15 IST
Next Story
मुंबई: वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात शिंदे गटात