शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने सत्तापालटाच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यासोबत पक्षाचे नेतेही पोहोचण्यास सुरुवात झाली. आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची चर्चा असतानाच दिपाली सय्यद यांचं ट्वीट; म्हणाल्या “शिवसेनेचा वाघ भाजपाला…”

“गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला, तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये आनंद दिघे यांचा उल्लेख केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी त्यांची मागणी होती. ही बातमी खरी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.

“एकनाथ शिंदेंनी जबरदस्त दणका दिला,” रामदास आठवलेंचं ट्वीट; म्हणाले “उद्धव ठाकरेंना आता…”

“मी आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होत २०१० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१६ मध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणावरुन आणि युवासेनेची घडी नीट बसवल्यानंतर आपल्या मागील तरुणांना योग्य पद मिळावं म्हणून राजीनामा दिला होता. काही पदावर नसलो तरी कायम शिवसैनिक राहीन,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“ठाण्यात फार गलिच्छ राजकारण सुरु होतं. जिथे मला बोलावण्यात आलं तिथे मी गेलो. आनंद दिघेंचा पुतण्या असल्याने मलाही स्वाभिमान आहे. मी कुठेही लाचार नव्हतो. दरवाजा उघडणं, पाया पडणं माझ्या तत्वात बसत नव्हतं. म्हणून आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला अनुसरुन मी कार्य करत होतो,” असंही त्यांनी सांगितलं.

“एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते तर लाखो शिवसैनिक होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने आपण एकटेच शिवसेना वाढवतो असं समजू नये. शिवसैनिकांमुळे ही संघटना वाढली आहे,” असं केदार दिघेंनी सांगितलं. नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल असेल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena anand dighe kedar dighe eknath shinde uddhav thackeray shivsena bhavan sgy