ठाण्यातील वाहतूक कोंडीवर आंनद नगर - साकेत उन्नत मार्गाचा उपाय |thane traffic solution anand nagar saket elevated road mmrda tender mumbai | Loksatta

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर आंनद नगर – साकेत उन्नत मार्गाची मात्रा ; मात्र दोन वेळा निवादा मागवूनही सल्लागार मिळेना

मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे.

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर आंनद नगर – साकेत उन्नत मार्गाची मात्रा ; मात्र दोन वेळा निवादा मागवूनही सल्लागार मिळेना
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. परिणामी, या प्रकल्पास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्यात येणाऱ्या आणि पुढे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीएने आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत रस्ता प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या उन्नत मार्गासाठी अंदाजे सुमारे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सुमारे ६.३० किमी लांबीच्या आणि सहा (येण्यासाठी तीन, जाण्यासाठी तीन) मार्गिकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाला २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : मुंबई विमानतळावर ८० कोटींचे ड्रग्ज जप्त; DRI ची मोठी कारवाई

त्यानंतर या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता डिसेंबर २०२१ मध्ये निविदा मागविण्यात आल्या. बांधकाम निविदापूर्व प्रक्रिया राबविण्यासह प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या सल्लागारावर असणार आहे. मात्र दोन वेळा मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएला सल्लागाराची नियुक्ती करता आलेली नाही. एमएमआरडीएने आता तिसऱ्यांदा निविदा मागविली असून इच्छुकांना १८ ऑक्टोबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava: मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच BKC मैदानातील लोक उठून निघून गेले; रिकाम्या खुर्च्यांचे Video Viral

संबंधित बातम्या

‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
‘टीम ओमी’चे शक्तिप्रदर्शन फुसके!
दिव्यातील रस्त्यांची उद्घाटनापर्यंतच धाव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच