मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी तब्बल ८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे आणि केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ १६ किलो हेरॉईन आढळून आलं आहे.

१४७६ कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणाचे धागेदोरे दक्षिण आफ्रिकेपर्यंत ; केरळमधील आयातदार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक

कतारमधील दोहा येथून मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला डीआरआयने ताब्यात घेतले. त्याचे नाव बिनू जॉन असून तो मूळचा केरळचा आहे. त्याच्या ट्रॉली बॅगचीही कसून तपासणी करण्यात आली. त्यात संशयीत भुकटी सापडली. तिची तपासणी केली असता ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जॉनला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्याला मुख्य आरोपीने हेरॉईन दिले होते. त्या बदल्यात त्याला एक हजार अमेरिकन डॉलर देण्याचे आमीष आरोपीने बिनूला दाखवले. त्यामुळे बिनू तस्करीसाठी तयार झाला.

हेही वाचा : मुंबईतील नाल्यामध्ये पोत्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

या घटनेमागे आंतराराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याची माहिती डीआरआयला मिळाली आहे.  बंदी घातलेल्या औषधांच्या व्यावसायिक प्रमाणात तस्करी केल्याबद्दल बिनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला २० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.