रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत मुंबईसह देशभरातील रेल्वेच्या विस्ताराला दिशा देणारा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भात सुरेश प्रभू कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. मात्र, सुरेश प्रभूंनी कोणत्याही मोठ्य़ा घोषणा करण्यापेक्षा मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्राधान्य दिले. यासाठी आगामी वर्षात उपनगरीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील उंची वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या दोन नव्या उन्नत मार्गांच्या उभारणीची घोषणा प्रभूंनी यावेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण घोषणा पुढीलप्रमाणे :

* चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग.
* चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग मेट्रो रेल्वेच्या स्थानकांशी जोडणार
* सुरक्षित प्रवासासाठी सर्व स्थानकांवरील रेल्वे फलाटांची उंची वाढवणार
* मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळदरम्यान विशेष कॉरिडॉर.
* चर्चगेट-विरार उन्नत मार्गाच्या कामासाठी तातडीने निविदा मागवणार
* अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात
* जपानच्या सहकार्याने अहमदाबाद-मुंबई हायस्पीड कॉरिडॉअरची स्थापना करणार
* सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What suresh prabhu will give to mumbai in railway budget