मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसह जालना – नांदेड समृद्धी मार्ग (विस्तारीत मार्ग) आणि पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी एकत्रित २६ टप्प्यांमध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. या निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून आता ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष बांधकामासाठी आर्थिक निविदा मागविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. स्वारस्य निविदा सादर केलेल्या कंपन्यांमधूनच पात्र कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे. तर डिसेंबरपर्यंत कंत्राट अंतिम करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच जलद प्रवासासाठी विरार-अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. तर मुंबई – नागपूर
तीन प्रकल्पांसाठी सादर झालेल्या निविदांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसीकडून आर्थिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर अखेरीस आर्थिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. तर डिसेंबरअखेर निविदा अंतिम करून नव्या वर्षात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूसंपादन वेगात
एकिकडे या तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे भूसंपादन प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. शक्य तितक्या लवकर भूसंपादन मार्गी लावण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. नव्या वर्षात काम सुरू करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work on three ambitious projects will begin in the new year mumbai print news ssb