नागपूर : रेल्वेच्या भोपाळ विभागातील जुझारपूर-पावरखेडा दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी हे पूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे येथून रेल्वेगाड्यांना नॉन-इंटरलॉकिंगद्वारे जे-जा करावे लागत आहे. रेल्वेगाड्यांची अतिशय संथ गती असल्याने काही रेल्वेगाड्यांना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अन् बिरसी विमानतळावर धडकले १०६ कुटुंब, जाणून घ्या कारण…

हेही वाचा – मराठा आरक्षण : बेमुदत उपोषणाला मुस्लीम बांधवांचे पाठबळ

रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांमध्ये १२१६० जबलपूर – अमरावती एक्सप्रेस (२८ ते ३० सप्टेंबर पर्यंत), १२१५९ अमरावती – जबलपूर एक्सप्रेस (२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत), २२१७५ नागपूर – जयपूर एक्सप्रेस (२८ सप्टेंबर), २२१७६ जयपूर- नागपूर एक्सप्रेस (२९ सप्टेंबर), ०१३१७/०१३१८ आमला – इटारसी- आमला (२५ ते ३० सप्टेंबरपर्यंत) २२१२५ नागपूर-अमृतसर एसी एक्सप्रेस (३० सप्टेंबर), २२१२६ अमृतसर-नागपूर-एसी एक्सप्रेस (२ ऑक्टोबर), १९३४३ इंदूर – सिवनी एक्सप्रेस (२८ ते ३० सप्टेंबरपर्यंत), १९३४४ छिंदवाडा – इंदूर एक्सप्रेस (२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत), २०९१७ इंदूर- पुरी एक्सप्रेस (२६ सप्टेंबर), २०९१८ पुरी- इंदूर एक्सप्रेस (२८ सप्टेंबर) रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 trains running through nagpur cancelled read details rbt 74 ssb