बुलढाणा : मोताळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला मुस्लीम बांधवांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना त्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. लाठीमाराचे आदेश देणाऱ्यावर कठोर कारवाई, मराठा समाजाला आरक्षण द्यावे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा यासाठी सहाजणांनी ८ सप्टेंबरपासून मोताळा येथे उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल

हेही वाचा – धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा, अखेर स्थानकावर बाळाचा जन्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपोषणास्थळी मुस्लीम बांधवांनी भेट देऊन पाठबळ दिले आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील ग्रा.पं. सरपंचपति शेख अलिम कुरेशी, राजूर सरपंच डॉ. अनिस खान, ग्रा. पं. सदस्य अ‍ॅड. वसीम कुरेशी, अलिम शाह, असलम खान, शेख जमीर, शेख जफर, सैयद वसीम, शेख इम्रान शेख रफिक, शेख अजहर, फारुख खान, मो. खालिद, सादिक खान, फिरोज खान यांनी लेखी समर्थन दिले आहे.